पंजाबमध्ये 24 तासांत चार विमानांत बॉम्ब ठेवण्याची धमकी; आरोपी म्हणे, वाचवू शकत असलात तर वाचवा

सुमारे दोन आठवड्यांपूर्वी विमानतळावरील सहाय्यक व्यवस्थापकाला फोनवरून ही धमकी देण्यात आली होती.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 18:19 PM, 3 Mar 2021
पंजाबमध्ये 24 तासांत चार विमानांत बॉम्ब ठेवण्याची धमकी; आरोपी म्हणे, वाचवू शकत असलात तर वाचवा

लुधियानाः पंजाबमधील लुधियाना विमानतळ उडवण्याची धमकी देण्यात आल्यानं एकच खळबळ उडालीय. 24 तासांत चार विमानांत बॉम्ब ठेवण्याचा इशाराही देण्यात आलाय. विमानतळ व्यवस्थापकाला अज्ञाताचा हा धमकीचा फोन आलाय. ही धमकी कोणी दिली याचा अद्याप शोध लागलेला नाही. सुमारे दोन आठवड्यांपूर्वी विमानतळावरील सहाय्यक व्यवस्थापकाला फोनवरून ही धमकी देण्यात आली होती. (Punjab Ludhiana Threats To Plant Bombs On Four Planes In 24 Hours)

धमकीनंतर लगेचच विमानतळावर सुरक्षा व्यवस्था कडक

धमकी मिळाल्यानंतर लगेचच विमानतळावर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आणि प्रत्येक संशयितावर नजर ठेवण्यात आली. फोकल पॉईंटवरील पोलीस स्टेशन पोलिसांनी दोन आठवड्यांच्या तपासणीनंतर सहाय्यक व्यवस्थापक पवन कुमार यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलीस आता या प्रकरणाचा तपास करत आहेत.

पवन कुमार विमानतळावर असिस्टंट मॅनेजर म्हणून तैनात

असिस्टंट मॅनेजर पवन कुमार यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, ते चंदीगड रोड फॉर्च्युन सिटीचा रहिवासी आहेत आणि विमानतळावर असिस्टंट मॅनेजर म्हणून तैनात असतात. 18 फेब्रुवारीला ते विमानतळावर ड्युटीवर होते. त्याच वेळी त्याच्या मोबाईलवर कॉल आला. कॉलर म्हणाला की, नवदीप ऊर्फ ​​नवी बोलतोय. येत्या 24 तासांत चार विमानांमध्ये बॉम्ब ठेवण्यात येणार आहेत. तुम्ही वाचवू शकत असलात तर वाचवा. त्याचबरोबर विमानतळही उडवण्याची धमकी देण्यात आली होती.

ते कोणत्याही नवदीपला ओळखत नाही

पवन यांच्या म्हणण्यानुसार, ते कोणत्याही नवदीपला ओळखत नाही. फोन मिळाल्यानंतर पवन यांनी पोलिसांना त्याबद्दल माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी विमानतळाची सुरक्षा कडक केली आणि तपास सुरू केला. आता दोन आठवड्यांनंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केलाय.

या प्रकरणाचा तपास केला जातोय, पोलिसांची माहिती

फोकल पॉईंटच्या पोलीस स्टेशनचे एसएचओ इन्स्पेक्टर दविंदर शर्मा म्हणाले की, आतापर्यंतच्या तपासणीत सॉफ्टवेअरमधून घेतलेल्या नंबरवरून कॉल केल्याचे समोर आलेय. या प्रकरणाचा तपास केला जात आहे. लवकरच कॉलरचा देखील शोध घेतला जाईल.

संबंधित बातम्या

Special Story | जगाला हादरवणारा अणू बॉम्ब 7200 फुटांवरुन कोसळला आणि गायब झाला, 63 वर्षांनंतर अद्यापही रहस्य गुलदस्त्यात

पश्चिम बंगाल : मेदिनीपूर जिल्ह्यात बॉम्ब हल्ल्यात TMC च्या कार्यकर्त्याचा मृत्यू, दोघे गंभीर

Punjab Ludhiana Threats To Plant Bombs On Four Planes In 24 Hours