पंजाबमध्ये फटाक्यांच्या फॅक्टरीत अग्नितांडव, 22 जणांचा मृत्यू, 20 जण जखमी

पंजाबमधील गुरुदासपूर जिल्ह्यात फटाक्याच्या ( Gurdaspur crackers factory fire) फॅक्टरीत भीषण स्फोट झाला.

पंजाबमध्ये फटाक्यांच्या फॅक्टरीत अग्नितांडव, 22 जणांचा मृत्यू, 20 जण जखमी

Gurdaspur crackers factory fire चंदीगड : पंजाबमधील गुरुदासपूर जिल्ह्यात फटाक्याच्या फॅक्टरीत भीषण स्फोट ( Gurdaspur crackers factory fire) झाला. या स्फोटात आतापर्यंत तब्बल 22 जणांचा मृत्यू झाला आहे. गुरुदासपूर जिल्ह्यातील बटाला इथल्या फटाक्यांच्या फॅक्टरीत हा स्फोट झाला. या दुर्घटनेत 15 ते 20 जण जखमी असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. बुधवारी दुपारी चारच्या सुमारास ही दुर्घटना घडली.

फटाके फॅक्टरीच्या 2 इमारतींमध्ये 50 जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या स्फोटानंतर आजूबाजूचा परिसर अक्षरश: हादरुन गेला.राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या दुर्घनेप्रकरणी शोक व्यक्त करत, मृतांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या.

या दुर्घटनेनंतर पोलीस आणि बचाव पथक तातडीने दाखल झालं. अपघातातील जखमींना रुग्णालयात हलवण्यात आलं. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह (Captain Amarinder Singh) यांनीही दु:ख व्यक्त केलं. बचावकार्य युद्धपातळीवर सुरु असल्याची माहिती त्यांनी दिली.

स्फोटानंतर इमारती कोसळल्या

ही दुर्घटना दुपारी चारच्या सुमारास घडली. फटाक्यांच्या स्फोटानंतर इमारतीही कोसळल्या. यामध्ये 22 जणांचा मृत्यू तर 15 ते 20 जण जखमी असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. काही लोक इमारतीच्या मलब्याखाली अडकल्याची शक्यता आहे.

फटाक्यांच्या स्फोटानंतर मोठं अग्नितांडव सुरु झालं. त्यानंतर स्थानिकांनी तातडीने अग्निशमन दलाला पाचारण केलं.  स्फोटामुळे निर्माण झालेल्या धुरामुळे इमारतीमधील कर्मचाऱ्यांनी बाहेर निघणंही कठीण झालं. अनेकांचा गुदमरुन तर अनेकांचा होरपळून मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे.

या दुर्घटनेत लाखोचं नुकसान झालं आहे. फटाक्यांची फॅक्टरी वैध होती की नाही याबाबतची माहिती मिळू शकलेली नाही.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *