Rafale | भारतीय वायुदलाला नवे शक्तिशाली पंख, आठ विमानांचं काम एकटा राफेल करणार

राफेल 20 हजार मीटर उंचीवरुन उड्डाण करु शकतं. हे लढाऊ विमान 2200 ते 2500 किलोमीटर प्रतितास या वेगाने उडू शकतं.

Rafale | भारतीय वायुदलाला नवे शक्तिशाली पंख, आठ विमानांचं काम एकटा राफेल करणार

नवी दिल्ली : शत्रूंच्या मनात धडकी भरवणारा पाच राफेल विमानांचा ताफा (Rafale Fighter Aircraft Features) भारताच्या अंबाला एअरबेस येथे दाखल झाला आहे. या ताफ्यातील पहिले पाच राफेल विमान अंबाला एअरबेसवर दाखल झाले आहेत. राफेल विमानांमुळे भारतीय वायुदलाच्या युद्ध क्षमतेत भर पडणार आहे (Rafale Fighter Aircraft Features).

राफेल विमानांमुळे भारतीय वायुदलाला नव्या ताकदीची पंख मिळणार

– राफेल लढाऊ विमानाला ‘सुपरस्टार ऑफ द स्काय’ म्हटलं जातं. कारण इतर लढाऊ विमानांच्या तुलनेत राफेल अधिक शक्तीशाली आहे.

– शत्रूच्या शक्तीस्थळांवर अचूक प्रहार करुन स्वत:चा बचाव करण्याचं तंत्रज्ञान राफेलमध्ये आहे, जे इतर कुठल्याही लढाऊ विमानात नाही.

– राफेलचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे ते एक ‘मल्टीरोल फायटर विमान’ आहे.

– राफेलआधी टेहळणी करणे, बॉम्बिंग, अण्वस्त्र हल्ला करणे यासर्वांसाठी वेगवेगळी विमानं वापरावी लागायची. पण, आता ही सर्व कामं राफेल एकट्याने करण्यास सक्षम आहे.

– राफेल एकटा तब्बल आठ विमानांची कामं करु शकतो. म्हणून या विमानाला मल्टीरोल फायटर विमान म्हणतात.

– राफेलमध्ये इलेक्ट्रॉनिक सिस्टिम, रडार आणि शस्त्रास्त्र विकसित करण्याचं काम सतत सरु असतं. त्यामुळे सध्या 4 प्लस जनरेशनचं असलेलं हे विमान उद्या 5 जनरेशनमध्ये सहज बदलू शकतं.

– या विमानात 25 किलोमीटर वायरींग असून 30 हजार प्रिसिशन पार्ट्स आहेत. असंख्य इलेक्ट्रॉनिक सर्किट या विमानात आहेत.

– राफेल 20 हजार मीटर उंचीवरुन उड्डाण करु शकतं. हे लढाऊ विमान 2200 ते 2500 किलोमीटर प्रतितास या वेगाने उडू शकतं.

– राफेल एक असं लढाऊ विमान आहे, जो एक मिनिटात 60 हजार फूट उंच झेप घेऊ शकतं.

– राफेलची मारक क्षमता ही जवळपास 3700 किलोमीटर इतकी आहे.

– यामध्ये मिटीअर मिसाईल आणि इस्त्राईल प्रणालीचा वापर करण्यात आला आहे.

Rafale Fighter Aircraft Features

– राफेलच्या कॉकपीटजवळ एक छोट्या चेंडूच्या आकाराचा ऑप्टीकल कॅमरा आहे. रडारने शोधलेल्या टार्गेट्सचा शोध या कॅमेऱ्याच्या मदतीने घेता येतो. हा कॅमेरा म्हणजे राफेलची दुर्बिण आहे.

– राफेलमध्ये एक खास डिजीटल कॅमेरा बसवलेला आहे. राफेल विमान कितीही वेगात असेल, तरी हा कॅमेरा लक्ष्याचे अचूक फोटो काढू शकतो.

– स्पेक्ट्रा हे राफेलचं सुरक्षा कवच आहे. स्पेक्ट्रा शत्रूचे रडार जॅम करतं. त्यामुळे शत्रूच्या रडारला राफेलचा शोध लावता येत नाही.

– विमानाच्या दिशेने येणाऱ्या क्षेपणास्त्राची माहिती सुद्धा स्पेक्ट्रा सिस्टिमकडूनच मिळते. रडार जॅम केल्यानंतरही एखादे क्षेपणास्त्र विमानाच्या जवळ आले, तर विमानातून निघणारे इलेक्ट्रो मॅग्नॅटिक प्लस विमानाच्या दिशेने येणाऱ्या क्षेपणास्त्राची दिशा बदलतात.

राफेलमधील स्काल्प मिसाईलची वैशिष्ट्ये

– स्काल्प हे हवेतून जमिनीवर मारा करणारे मिसाईल आहे. 300 किलोमीटर अंतरापर्यंतच्या लक्ष्यावर अचूक प्रहार करण्याची या मिसाईलची क्षमता आहे.

– “स्काल्प मिसाईलने आपली क्षमता सिद्ध केली आहे. शत्रुच्या प्रदेशातील पुल, रेलरोड, ऊर्जा प्रकल्प, धावपट्टी, बंकरही उद्धवस्त करु शकतो. जमिनीलगत उड्डाण करण्याच्या क्षमतेमुळे स्काल्प शत्रुच्या हवाई सुरक्षा यंत्रणेला चकवा देऊ शकते”, असे हे मिसाईल बनवणाऱ्या MBDA च्या अधिकाऱ्याने सांगितले.

– स्काल्प मिसाईल यूके वायुदल आणि फ्रेंच वायुदल वापरतात. खाडी युद्धात हे मिसाईल वापरण्यात आले आहे.

राफेल विमान

मोदी सरकारने 2016 मध्ये 36 राफेल लढाऊ विमानं खरेदी करण्याचा करार फ्रान्सशी केला होता. यापूर्वी यूपीए सरकारच्या काळात 126 राफेल विमानांचा करार झाला होता, मात्र त्यावेळी काही नियम अटींमुळे हा करार पूर्ण होऊ शकला नव्हता. मोदी सरकारने केलेल्या करारावरुन काँग्रेसने घोटाळ्याचा आरोप केला होता. सुप्रीम कोर्टापर्यंत हे प्रकरण पोहोचलं. पण कोर्टाने मोदी सरकारला क्लीनचीट दिली.

राफेल लढाऊ विमान खरेदी व्यवहार काय आहे?

भारत आणि फ्रान्स यांच्यात 36 राफेल लढाऊ विमान खरेदी करण्याचा व्यवहार 23 सप्टेंबर 2016 रोजी झाला. 7.87 अब्ज युरो म्हणजेच जवळपास 59 हजार कोटी रुपयांचा हा करार आहे. हा व्यवहार दोन्ही देशांच्या सरकारांमध्ये झाला. भारताची हवाई ताकद वाढवण्याच्या दृष्टीने हा व्यवहार झाला. ही विमानं फ्रान्सची दसॉल्ट कंपनीने तयार केली आहेत. ही विमानं सप्टेंबर 2019 मध्ये भारताला मिळणार होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 एप्रिल 2015 रोजी फ्रान्स दौऱ्यावर होते, त्यावेळी मोदी आणि फ्रान्सचे तत्कालिन अध्यक्ष फ्रांसवा ओलांद यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन या व्यवहाराची माहिती दिली होती (Rafale Fighter Aircraft Features).

संबंधित बातम्या :

Rafale | भारतीय वायुदलाचे सामर्थ्य वाढणार, फ्रान्सहून पाच राफेल विमाने रवाना

भारताकडून चीनला चोख प्रत्युत्तर देण्याची तयारी, लडाख सीमेवर राफेल तैनात होणार

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *