Rahul Bhatt : खून का बदला खून, राहुल भट्टची हत्या करणाऱ्या दोन्ही अतिरेक्यांना कंठस्नान, 24 तासात सैन्यानं करून दाखवलं

Rahul Bhatt : खून का बदला खून, राहुल भट्टची हत्या करणाऱ्या दोन्ही अतिरेक्यांना कंठस्नान, 24 तासात सैन्यानं करून दाखवलं
राहुल भट्टची हत्या करणाऱ्या दोन्ही अतिरेक्यांना कंठस्नान
Image Credit source: tv9

आज सैन्याला एक मोठं यश मिळालं आहे. कारण राहुल भट्टची हत्या करणाऱ्या दोन्ही अतिरेक्यांना कंठस्नान घालण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तर या हत्येनंतर काश्मिरी पंडितांचाही आक्रमक पवित्रा पहायला मिळाला आहे.

दादासाहेब कारंडे

|

May 13, 2022 | 6:37 PM

जम्मू-काश्मीर : गुरुवारी राहुल भट्ट (Rahul Bhatt) यांची हत्या झाल्यानंतर देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या होत्या. त्यानंतर सैन्यदल (Indian Army) पुन्हा एक्शन मोडमध्ये आले. आज सैन्याला एक मोठं यश मिळालं आहे. कारण राहुल भट्टची हत्या करणाऱ्या दोन्ही अतिरेक्यांना (Terrorist Killed) कंठस्नान घालण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तर या हत्येनंतर काश्मिरी पंडितांचाही आक्रमक पवित्रा पहायला मिळाला आहे. काश्मिरी पंडित राहुल भट्ट यांच्या हत्येनंतर सुरक्षा दलांनी त्यांची पत्नी मीनाक्षी यांना दोन दिवसांत दहशतवाद्यांचा खात्मा करण्याचे आश्वासन दिले होते. लष्कराने 24 तासांत आपले वचन पूर्ण केले. त्यांनी शुक्रवारी संध्याकाळी बांदीपोरामध्ये तीन दहशतवाद्यांना ठार केल्याची माहिती सूत्रांच्या हवाल्याने देण्यात आली आहे. यामध्ये मारले गेलेले दोन दहशतवादी राहुल भट्टच्या हत्येत सामील होते.

सुरक्षा दलांनी काय सांगितले?

काश्मीरच्या आयजींनी सांगितले की, अलीकडेच भारतीय लष्करचे दोन पाकिस्तानी दहशतवादी घुसखोरी करून भारतात घुसले होते. बांदीपोरा येथे सुरक्षा दलांची त्यांच्याशी चकमक झाली. 11 मे रोजी दहशतवादविरोधी कारवाईदरम्यान दोघेही पळून गेले आणि साळिंदर जंगल परिसरात लपले. गुप्तचर यंत्रणांनी दहशतवादी हल्ल्याबाबत सुरक्षा दलांना अलर्ट जारी केला होता. 10 मे रोजी बांदीपोरा भागात तीन अज्ञात दहशतवाद्यांच्या हालचाली टिपण्यात आल्याचे अलर्टमध्ये म्हटले आहे. हे दहशतवादी सतत त्यांचे ठिकाण बदलत असतात. हे दहशतवादी सुरक्षा दल, सुरक्षा दलांची वाहने आणि पिकेट्स यांना लक्ष्य करू शकतात. बांदीपोरामध्ये 10 मे पूर्वी, 30 एप्रिललाही तीन दहशतवाद्यांचे लोकेशन ट्रॅक करण्यात आले होते. त्यापैकी दोन पाकिस्तानी दहशतवादी होते. दोन्ही पाकिस्तानी दहशतवादी उर्दू भाषिक आहेत. त्यांच्यासोबत एक स्थानिक दहशतवादीही होता. दोन पाकिस्तानी नागरिकांसोबत पकडलेला तिसरा दहशतवादी स्थानिक भाषा बोलत होता.

बदलीसाठीही प्रयत्न सुरू होते

गुरीवारी काश्मिरी पंडीत राहुल भट्ट हे दहशतवाद्यांचे शिकार झाले. राहुल भट्ट यापूर्वी बडगाम डीसी कार्यालयात तैनात होते. दोन वर्षांपूर्वी त्यांची चदूर येथे बदली झाली. मात्र, राहुल भट्ट सतत बदलीबाबत बोलत होते. पण डीसी बडगाम आणि एसीआरने ते मान्य केले नाही. जेव्हा काश्मीरमध्ये दोन शिक्षकांची हत्या झाली होती, त्यानंतरही राहुल यांनी सुरक्षेचे कारण सांगून बदली मागितली होती, मात्र त्यांची बदली झाली नाही. भारतीय सैन्य हे जगातील उत्तम सैन्यापैकी एक मानले जाते. त्यांची ताकद त्यांनी पुन्हा सिद्ध करुन दाखवली आहे.

हे सुद्धा वाचा


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें