संघाचे पंतप्रधान भारतमातेशी खोटं बोलतात : राहुल गांधी

नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पंतप्रधान भारतमातेशी खोटं बोलतात, अशा शब्दात काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. देशात छावणी केंद्र (डिटेन्शन सेंटर) नसल्याच्या मोदींच्या  वक्तव्यावर राहुल गांधींनी शरसंधान (Rahul Gandhi on Detention Center) साधलं. आसाममधील छावणी केंद्राशी संबंधित बातमी शेअर करत राहुल गांधी यांनी ‘आरएसएसचे पंतप्रधान भारतमातेशी खोटं …

Rahul Gandhi on Detention Center, संघाचे पंतप्रधान भारतमातेशी खोटं बोलतात : राहुल गांधी

नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पंतप्रधान भारतमातेशी खोटं बोलतात, अशा शब्दात काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. देशात छावणी केंद्र (डिटेन्शन सेंटर) नसल्याच्या मोदींच्या  वक्तव्यावर राहुल गांधींनी शरसंधान (Rahul Gandhi on Detention Center) साधलं.

आसाममधील छावणी केंद्राशी संबंधित बातमी शेअर करत राहुल गांधी यांनी ‘आरएसएसचे पंतप्रधान भारतमातेशी खोटं बोलतात’ असं ट्वीट केलं.

अलिकडेच, नरेंद्र मोदींनी दिल्लीच्या रामलीला मैदानातील सभेत याविषयी सांगितलं होतं. देशात छावणी केंद्राबद्दल पसरवल्या जाणार्‍या अफवा अगदी खोट्या आहेत. मात्र राहुल गांधींनी शेअर केलेल्या वृत्तानुसार आसाममध्ये एक छावणी केंद्र उभारलेले आहे.

जे भारताच्या मातीतील मुस्लिम आहेत, ज्यांचे पूर्वज भारतमातेचे सुपुत्र आहेत, त्यांच्याशी सुधारित नागरिकत्व कायदा आणि एनआरसी या दोन्हीचा काहीही संबंध नाही. देशातील मुस्लिमांना ना छावणी केंद्रावर पाठवलं जात आहे, ना भारतात कोणतंही छावणी केंद्र आहे. हे असत्य आहे, हा वाईट हेतू असणाऱ्यांचा खेळ आहे. ते खोटं बोलण्यासाठी कोणत्या थराला जाऊ शकतात, हे पाहून हैराण झालो’ असं नरेंद्र मोदी म्हणाले होते. (Rahul Gandhi on Detention Center)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *