DRDO चे अभिनंदन आणि मोदींना रंगभूमी दिनाच्या शुभेच्छा : राहुल गांधी

मुंबई : डीआरडीओने ‘मिशन शक्ती’ यशस्वी केल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी डीआरडीओचे अभिनंदन केल आहे. मात्र याच ट्वीटमध्ये मोदींना रंगभूमी दिनाच्या शुभेच्छा देऊन, राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोमणा मारला आहे. राहुल गांधी यांच्या या ट्वीटची सोशल मीडियावर सध्या जोरदार चर्चा सुरु झाली आहे. राहुल गांधी नेमकं काय म्हणाले? “डीआरडीओने अत्यंत उत्तम काम …

DRDO चे अभिनंदन आणि मोदींना रंगभूमी दिनाच्या शुभेच्छा : राहुल गांधी

मुंबई : डीआरडीओने ‘मिशन शक्ती’ यशस्वी केल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी डीआरडीओचे अभिनंदन केल आहे. मात्र याच ट्वीटमध्ये मोदींना रंगभूमी दिनाच्या शुभेच्छा देऊन, राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोमणा मारला आहे. राहुल गांधी यांच्या या ट्वीटची सोशल मीडियावर सध्या जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

राहुल गांधी नेमकं काय म्हणाले?

“डीआरडीओने अत्यंत उत्तम काम केलंय. तुमचा सार्थ अभिमान वाटतो. त्याचबरोबर, पंतप्रधानांना जागतिक रंगभूमी दिनाच्या शुभेच्छा.”, असे ट्वीट राहुल गांधी यांनी केले आहे.

मिशन शक्ती यशस्वी

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारताचं मिशन शक्ती यशस्वी झाल्याची माहिती दिली. “आमच्या वैज्ञानिकांनी अंतराळात 300 किमी दूर LEO (Low Earth Orbit) मध्ये एका लाईव्ह सॅटेलाईट पाडलं. हे लाईव्ह सॅटेलाईट पूर्वनियोजित लक्ष्य होतं. त्याला अँटी सॅटेलाईट मिसाईल (A-SAT) द्वारे पाडण्यात आलं.काही वेळापूर्वी भारताने मोठं यश मिळवलं आहे. भारताने अंतराळात हे यश मिळवलं. अमेरिका, चीन आणि रशियानंतर अशी कामगिरी करणारा चौथा देश ठरला, असं मोदी म्हणाले.

भारतीय वैज्ञानिकांनी या मिशनअंतर्गत सर्व लक्ष्य यशस्वीरित्या पूर्ण केले. या मोहिमेसाठी भारतीय बनावटीच्या सॅटेलाईटचा वापर करण्यात आला होता.

संबंधित बातम्या :

काय आहे LEO सॅटेलाईट आणि त्याला पाडणारी भारताची ASAT यंत्रणा?

‘मिशन शक्ती’ची तयारी 2012 पासूनच, भारत एक पाऊल निश्चित पुढे : पृथ्वीराज चव्हाण

मिशन शक्ती यशस्वी, भारताने 300 किमी अंतराळात सॅटेलाईट पाडलं : मोदी

आधी ट्वीट, मग भाषण… मोठ्या घोषणांसाठी मोदींची अनोखी स्टाईल

‘मिशन शक्ती’बाबत नरेंद्र मोदींचं भाषण जसंच्या तसं, त्यांच्याच शब्दात

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *