मसूद अजहर 'जीं' ना अजित डोभाल यांनीच सोडलं होतं : राहुल गांधी

नवी दिल्ली : सोमवारी काँग्रेसने राजधानी दिल्लीतील इंदिरा गांधी स्टेडिअममध्ये एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमाचं नाव होतं ‘मेरा बूथ, मेरा गौरव’. याच कार्यक्रमात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. पण ही टीका करताना राहुल गांधींनी दहशतवादी मसूद अजहरचा उल्लेख आदरार्थी केल्याने एकच खळबळ उडाली. यावरुन राहुल गांधींना सोशल मीडियावर …

मसूद अजहर 'जीं' ना अजित डोभाल यांनीच सोडलं होतं : राहुल गांधी

नवी दिल्ली : सोमवारी काँग्रेसने राजधानी दिल्लीतील इंदिरा गांधी स्टेडिअममध्ये एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमाचं नाव होतं ‘मेरा बूथ, मेरा गौरव’. याच कार्यक्रमात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. पण ही टीका करताना राहुल गांधींनी दहशतवादी मसूद अजहरचा उल्लेख आदरार्थी केल्याने एकच खळबळ उडाली. यावरुन राहुल गांधींना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जातंय.

राहुल गांधी म्हणाले, पुलवामा हल्ला कुणी केला? जैश ए मोहम्मदने केला. यामागे मसूद अजहरचा हात होता. त्याला कंधारमध्ये नेऊन कुणी सोडलं? सध्याचे जे सुरक्षा सल्लागार आहेत, त्यांनी सोडलं होतं. त्यांनीच मसूद ‘अजहरजीं’ना पाकिस्तानच्या ताब्यात दिलं. आज संपूर्ण देशाला माहित आहे, की पंतप्रधानांच्या तोंडून सत्य निघूच शकत नाही”

पाहा – दिग्विजय सिंह जेव्हा दहशतवादी हाफिज सईदला साहेब म्हणाले होते

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *