राहुल गांधींसारख्या दिसणाऱ्या व्यक्तीने लूक बदलला!

नवी दिल्ली :  लोकसभा निवडणूक 2014 दरम्यान प्रशांत सेठी या व्यक्तीचं नाव चर्चेत आलं होतं. याचं कारण म्हणजे प्रशांत सेठी हे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासारखे दिसतात. त्यामुळे ते मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. सध्या देशात सुरु असलेल्या लोकसभा निवडणुकांमध्येही प्रशांत सेठी हे चर्चेचा विषय ठरले आहेत. पण, यावेळी कारण जरा वेगळं आहे. प्रशांत सेठी यांना …

राहुल गांधींसारख्या दिसणाऱ्या व्यक्तीने लूक बदलला!

नवी दिल्ली :  लोकसभा निवडणूक 2014 दरम्यान प्रशांत सेठी या व्यक्तीचं नाव चर्चेत आलं होतं. याचं कारण म्हणजे प्रशांत सेठी हे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासारखे दिसतात. त्यामुळे ते मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. सध्या देशात सुरु असलेल्या लोकसभा निवडणुकांमध्येही प्रशांत सेठी हे चर्चेचा विषय ठरले आहेत. पण, यावेळी कारण जरा वेगळं आहे. प्रशांत सेठी यांना राहुल गांधींसारखं नव्हत दिसायचं म्हणून त्यांनी आपला लूकच बदलून टाकला आहे.

प्रशांत सेठी हे 30 वर्षांचे आहेत आणि विशेष म्हणजे ते भाजपचे समर्थक आहेत. त्यामुळे त्यांना राहुल गांधींसारखं दिसणं आवडत नाही. त्यामुळे त्यांनी स्वत:चा लूक बदलण्याचा विचार केला. त्यासाठी त्यांनी तब्बल 20 किलो वजन वाढवलं. त्याशिवाय त्यांनी हेअर स्टाईलही बदलली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित एका बॉलिवूड सिनेमामध्ये प्रशांत सेठी यांना राहुल गांधी यांची भूमिका साकारण्यासाठी विचारण्यात आलं होतं. मात्र, त्यांनी नकार दिला, असा दावा प्रशांत सेठी यांनी केला. “मी राहुल गांधींचा खूप आदर करतो. ते एक राष्ट्रीय नेते आहेत. पण, मी भाजप समर्थक आहे. मला राहुल गांधी यांच्यासारखं दिसायचं नाही. मी मोदींचा समर्थक आहे. त्यामुळे मी सिनेमाही सोडला”, असं प्रशांत सेठी यांनी सांगितलं.

“राहुल गांधी यांनी आजवर असं कुठलंही काम केलेलं नाही, ज्यावर चर्चा केली जाऊ शकते. मी या देशाचा नागरिक आहे आणि मला राहुल गांधींकडून अनेक अपेक्षा आहेत”, असेही प्रशांत सेठी म्हणाले. प्रशांत हे सोशल मीडियावर राहुल गांधींवरील मीम्समुळे त्रस्त झाले होते. तसेच, ते काँग्रेसच्या राजकीय विचारधारेविरुद्ध आहेत.

प्रशांत सेठी यांच्या पत्नी गुंजन सेठी यांनाही त्यांच्या या नवीन लूकपासून कुठलाही आक्षेप नाही. “मला माझ्या पतीच्या लूकपासून कुठलाही आक्षेप नाही. ते बॉलिवूड अभिनेता नील नितीन मुकेश यांच्यासारखे दिसतात. एका भारतीय नेत्यासारखं दिसण्यापेक्षा कुठल्या बॉलिवूड सेलिब्रिटीसारखं दिसलेलं अधिक चांगलं”, असं गुंजन सेठी यांनी सांगितलं.

VIDEO :

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *