VIDEO : फिटनेससोबत बचत, मशीनसमोर उठाबशा काढा आणि मोफत तिकीट मिळवा, रेल्वेची भन्नाट आयडिया

फिटनेसला प्रोत्साहन देण्यासाठी रेल्वेने अनोखी शक्कल लढवली आहे. रेल्वे स्टेशनवर असं मशीन बसवण्यात आलं आहे, ज्याच्यासमोर उठा-बशा काढल्या की प्लॅटफॉर्म तिकीट मोफत मिळणार आहे.

Railway Fitness Machine, VIDEO : फिटनेससोबत बचत, मशीनसमोर उठाबशा काढा आणि मोफत तिकीट मिळवा, रेल्वेची भन्नाट आयडिया

नवी दिल्ली : फिटनेसला प्रोत्साहन देण्यासाठी रेल्वेने अनोखी शक्कल लढवली आहे. रेल्वे स्टेशनवर (Railway Fitness Machine) असं मशीन बसवण्यात आलं आहे, ज्याच्यासमोर उठा-बशा काढल्या किंवा व्यायाम केला तर प्लॅटफॉर्म तिकीट फुकटात मिळणार आहे. रेल्वेमंत्री पियुष गोयल (Piyush Goyal) यांनी व्हिडीओ ट्विट करुन याबाबतची माहिती दिली. (Railway Fitness Machine)

दिल्लीतील आनंद विहार रेल्वे स्टेशनवर हे मशीन बसवण्यात आलं आहे. फिटनेससोबत बचत सुद्धा असं म्हणत रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी हा व्हिडीओ ट्विट केला.

“फिटनेससोबत बचत : दिल्लीतील आनंद विहार रेल्वे स्टेशनवर फिटनेसला प्रोत्साहन देण्यासाठी अनोखा प्रयोग करण्यात आला आहे. इथे बसवण्यात आलेल्या मशीनसमोर जर व्यायाम केला तर प्लॅटफॉर्म तिकीट निशुल्क मिळू शकतं”, असं रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं.

आनंद विहार रेल्वे स्टेशन हे दिल्लीतील सर्वाधिक व्यस्त स्थानकापैकी एक आहे. देशातील विविध रेल्वे स्थानकांमध्ये प्रवाशांना नव्या आणि आधुनिक सुविधा रेल्वेमार्फत देण्यात येणार आहेत. त्यामध्ये आनंद विहार रेल्वे स्थानकाचा समावेश आहे. एकीकडे प्रवाशांना सोई-सुविधा देताना, त्यांच्या आरोग्याचीही काळजी घेण्याचा प्रयत्न रेल्वेने केला आहे.

त्याचाच भाग म्हणून आनंद विहार स्टेशनवर असं मशीन बसवण्यात आलं आहे, ज्याच्यासमोर व्यायाम केला किंवा उठाबशा काढल्या तर प्लॅटफॉर्म तिकीट मोफत मिळणार आहे.

दरम्यान, पियुष गोयल यांच्या ट्विटमध्ये अनेक प्रवाशांनी रिप्लाय देत स्वागत केलं आहे. शिवाय काही प्रवाशांनी असं मशीन मुंबईतही रेल्वे स्थानकांवर बसवण्याची मागणी केली आहे.

तिकीट कसं मिळेल?

मशीनसमोर दोन पायाचे ठसे असलेले चिन्ह बनवले आहे. या पदचिन्हांवर उभे रहा आणि बैठका मारणे सुरु करा. 180 सेकंदात आपल्याला 30 बैठका माराव्या लागतील. मशीनवरील डिस्प्लेवर तुम्हाला पॉईंट्स दिसतील. एका बैठकीला एक पॉईंट देण्यात येईल. जर तुम्ही 180 सेकंदात 30 उठाबशा काढल्या तर तुम्हाला प्लॅटफॉर्म तिकीट मोफत मिळेल.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *