खाकी वर्दीत प्रीव्हेडिंग, पत्नीकडून लाच घेतानाचा सीन, पोलिसाला नोटीस

राजस्थान पोलिस विभागात कार्यरत असलेल्या धनपतने आपली होणारी पत्नी किरणसोबत प्री-व्हेडिंग व्हिडीओ शूट केलं. यामध्ये पोलिसाच्या गणवेशात असलेला धनपती पत्नीकडून लाच स्वीकारताना दाखवल्याने त्याच्यावर कारवाई बडगा उगारण्यात आला आहे

खाकी वर्दीत प्रीव्हेडिंग, पत्नीकडून लाच घेतानाचा सीन, पोलिसाला नोटीस

जयपूर : खाकी वर्दी घालून बायकोसोबत प्री-व्हेडिंग व्हिडीओ शूट (Pre Wedding Video Shoot) करणं राजस्थानातील पोलिसाच्या (Rajasthan Police) अंगलट आलं आहे. व्हिडीओमध्ये पत्नीकडून लाच घेतानाचं दृश्य दाखवल्यामुळे वरिष्ठांची नाराजी ओढवली. अखेर संबंधित पोलिस अधिकाऱ्याला नोटीस पाठवण्यात आली आहे.

राजस्थान पोलिस विभागात कार्यरत असलेल्या धनपतने आपली होणारी पत्नी किरणसोबत प्री-व्हेडिंग व्हिडीओ शूट केलं होतं. उदयपूरमध्ये शूट केलेला हा व्हिडीओ यूट्यूबवर अपलोड केल्यानंतर त्याच्या वरिष्ठांच्याही नजरेत आला.

या व्हिडीओतील एका दृश्यावरुन आक्षेप घेण्यात येत आहे. ट्राफिक ड्युटीवर नाकाबंदीसाठी उभा असताना धनपत एका विनाहेल्मेट दुचाकीस्वार तरुणीला अडवतो. तिने कारवाई टाळण्यासाठी दिलेली लाच तो स्वीकारतो.

लाचेची रक्कम ठेवण्यासाठी धनपत पाकीट काढायला जातो, तेव्हा त्याचं पाकीट गायब असतं. त्या तरुणीनेच ते चोरल्याचं धनपतला जाणवतं. अशाप्रकारे दोघांच्या भेटीगाठी वाढत जातात आणि ते एकमेकांच्या प्रेमात पडतात, अशी कथा व्हिडीओमध्ये दाखवण्यात आली आहे.


पोलिस लाच स्वीकारतानाचं दृश्य पाहून धनपतच्या वरिष्ठांचा तीळपापड झाला. पोलिसांची प्रतिमा मलिन होत असल्याचा दावा करत त्यांनी पोलिस महानिरीक्षकांच्या कानावर ही गोष्ट घातली.

खाकी वर्दीचा गैरवापर केल्याबद्दल धनपतला पोलिस महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था) डॉ. हवा सिंग घुमरिया यांनी नोटीस बजावली आहे. त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

“वर्दीचा सन्मान” राखला जात असल्याची काळजी घेण्याचे आदेश सर्व पोलिस अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. विशेषतः प्री-वेडिंगसाठी पोलिस गणवेश न वापरण्यास बजावलं गेलं आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *