विधानसभा निवडणूक : राजस्थान, तेलंगणात आज मतदान

Rajasthan and Telangana Elections : राजस्थान आणि तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान आहे. सकाळी सात वाजल्यापासून दोन्ही राज्यात मतदानाला सुरुवात झाली आहे. याआधी छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि मिझोरमसाठी मतदान पार पडलं. या पाचही राज्यांचा निकाल 11 डिसेंबर रोजी लागणार आहे. राजस्थान राजस्थान विधानसभेची एकूण सदस्यसंख्या 200 आहे. 2013 सालच्या निवडणुकीत भाजपने 160 जागांवर विजय मिळवत …

विधानसभा निवडणूक : राजस्थान, तेलंगणात आज मतदान

Rajasthan and Telangana Elections : राजस्थान आणि तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान आहे. सकाळी सात वाजल्यापासून दोन्ही राज्यात मतदानाला सुरुवात झाली आहे. याआधी छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि मिझोरमसाठी मतदान पार पडलं. या पाचही राज्यांचा निकाल 11 डिसेंबर रोजी लागणार आहे.

राजस्थान

राजस्थान विधानसभेची एकूण सदस्यसंख्या 200 आहे. 2013 सालच्या निवडणुकीत भाजपने 160 जागांवर विजय मिळवत स्पष्ट बहुमत मिळवलं होतं. तर काँग्रेसला केवळ 25 जागांवर समाधान मानावं लागलं होतं. यावेळी काँग्रेस आणि भाजपची थेट टक्कर असेल.

तेलंगणा

2014 साली नव्याने निर्माण झालेल्या तेलंगणामध्ये तेलंगणा राष्ट्र समिती म्हणजेच टीआरएसने सत्ता मिळवली होती. पण काही दिवसांपूर्वीच तेलंगणा विधानसभा विसर्जित करण्यात आली. मागच्या निवडणुकीत 119 सदस्यसंख्या असलेल्या तेलंगणा राज्याच्या विधानसभा निवडणुकीत टीआरएसने 90, काँग्रेस 13, एमआयएम सात, भाजप पाच, टीडीपी तीन आणि सीपीआय (एम) ने एका जागेवर विजय मिळवला होता.

वाचा : पाच राज्यांमधील 2013 सालचं चित्र कसं होतं?

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *