मालेगाव स्फोटातील आरोपी निवृत्त मेजर राजकारणात, पक्षही ठरला!

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी रमेश उपाध्याय (Ramesh Upadhyay) यांनी राजकारणात प्रवेश केला आहे. त्यांनी नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेडमध्ये (जदयू) प्रवेश केला आहे. (Ramesh Upadhyay joined Nitish Kumar's parti Janata Dal United JDU)

मालेगाव स्फोटातील आरोपी निवृत्त मेजर राजकारणात, पक्षही ठरला!
Follow us
| Updated on: Oct 17, 2020 | 12:17 PM

लखनऊ : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी रमेश उपाध्याय (Ramesh Upadhyay) यांनी राजकारणात प्रवेश केला आहे. त्यांनी नितीश कुमार (Nitish Kumar) यांच्या जनता दल युनायटेड (जदयू) या पक्षात प्रवेश केला आहे. जदयूचे अध्यक्ष अनूप सिंह पटेल यांनी 12 ऑक्टोबरला उपाध्याय यांना नियुक्ती पत्र दिले.तसेच जदयूने त्यांना उत्तर प्रदेशात माजी सैनिक सेलच्या राज्य संयोजकपदी नियुक्त केले असून लवकरच उत्तर प्रदेशच्या दोऱ्यावर जाणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. (Ramesh Upadhyay accused in Malegaon bomb blast case joined Nitish Kumar’s parti Janata Dal United (JDU))

रमेश उपाध्याय हे भारतीय सैन्यातील निवृत्त मेजर आहेत. 2008 साली मालेगावातील बॉम्बस्फोटात सहभाग असल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (ATS) साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर तसेच लेफ्टनंट कर्नल श्रीकांत पुरोहित यांच्यासोबत रमेश उपाध्याय यांना अटक केली होती. 2017 मध्ये त्यांना जामीन मिळाला असून ते सध्या पुण्यात आहेत.

निवडणूक लढण्याची इच्छा नाही, पण लवकरच उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर

पक्षप्रवेशाबद्दल रमेश उपाध्याय म्हणाले, “उत्तर प्रदेशातील जदयूच्या नेत्यांनी माझ्याशी संपर्क साधला. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर मी जदयूसाठी काम करण्याचे ठरवले आहे. सध्यातरी निवडणूक लढण्याचा माझा कोणताही विचार नाही. पण, पक्षाच्या कामासाठी लवकरच उत्तर प्रदेशचा दौरा करणार आहे. मला जदयूचे नेतृत्व तसेच सामाजिक न्यायासोबतच विकासासाची संकल्पना आवडते.”

तसेच मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपांबद्दल विचारले असता, मी निर्दोष असल्याचे त्यांनी सांगितले. मी एक राष्ट्रवादी आणि सच्चा देशभक्त असून, मालेगाव प्रकरणात मला चुकीच्या पद्धतीनं गोवल्याचंही ते म्हणाले.

संबंधित बातम्या :

50 सिरीअल बॉम्बस्फोटातील कुख्यात दहशतवादी मुंबईतून फरार

Pragya Thakur | खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांना भर कार्यक्रमात भोवळ

मालेगाव बॉम्बस्फोट : प्रज्ञा ठाकूर, कर्नल पुरोहितला कोर्टात हजेरीचे आदेश

(Ramesh Upadhyay accused in Malegaon bomb blast case joined Nitish Kumar’s parti Janata Dal United (JDU))

Non Stop LIVE Update
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.