होळी खेळताना 500, 2 हजाराच्या नोटा सांभाळा, रंग लागलेल्या नोटांचं काय होणार?

मुंबई: देशभरात होळीनिमित्त रंगाचा उत्सव साजरा केला जात आहे. एकमेकांना रंग लावून होळीचा आनंद साजरा केला जात आहे. मात्र होळीच्या पार्श्वभूमीवर सध्या व्हॉट्सअॅपवर एक मेसेज फिरत आहे. रंग लागलेल्या नोटा बँका घेणार नाहीत, असं या मेसेजमध्ये म्हटलं आहे. व्हॉट्सअॅपवर कोणता मेसेज फिरतोय? “जर तुम्ही होळीच्या रंगात रंगण्यासाठी सज्ज झाला असाल, तर एक गोष्ट लक्षात ठेवा. …

होळी खेळताना 500, 2 हजाराच्या नोटा सांभाळा, रंग लागलेल्या नोटांचं काय होणार?

मुंबई: देशभरात होळीनिमित्त रंगाचा उत्सव साजरा केला जात आहे. एकमेकांना रंग लावून होळीचा आनंद साजरा केला जात आहे. मात्र होळीच्या पार्श्वभूमीवर सध्या व्हॉट्सअॅपवर एक मेसेज फिरत आहे. रंग लागलेल्या नोटा बँका घेणार नाहीत, असं या मेसेजमध्ये म्हटलं आहे.

व्हॉट्सअॅपवर कोणता मेसेज फिरतोय?

“जर तुम्ही होळीच्या रंगात रंगण्यासाठी सज्ज झाला असाल, तर एक गोष्ट लक्षात ठेवा. होळी खेळताना खिशात 500 किंवा 2 हजार रुपयांच्या नोटा ठेवू नका. कारण 500 आणि 2000 रुपयांच्या नोटांना रंग लागल्यास त्या बाद होतील. अशा नोटा बँका स्वीकारणार नाहीत. आरबीआयच्या मार्गदर्शिकेत असं नमूद करण्यात आलं आहे” हा मेसेज सध्या व्हॉट्सअॅपवर व्हायरल होत आहे. हा मेसेज सर्वजण आपलं जनजागृतीचं कर्तव्य म्हणून फॉरवर्डही करत आहेत.

या मेसेजमागील सत्य काय?
हा मेसेज व्हायरल होत असला, तरी त्यामध्ये तथ्य आहे का? आरबीआयने खरंच नवी मार्गदर्शिका जारी केली आहे का? तर अजिबात नाही!
मात्र आरबीआयने 2017 मध्ये एक गाईडलाईन जारी केली होती, त्याबद्दल जरुर खबरदारी घ्यायला हवी.

रंग लागलेल्या नोटांबाबत RBI चा नियम काय?
खरंतर होळीनंतर दुकानदार किंवा आपण स्वत: रंग लागलेल्या नोटा घेणं टाळतो. रंग लागलेल्या नोटा खऱ्या की खोट्या हे ओळखणं अवघड असतं. मात्र तुमच्याकडे जर रंग लागलेल्या किंवा फाटलेल्या नोटा असल्या, तरी घाबरण्याचं कारण नाही. कारण या नोटा तुम्ही बँकेत जाऊन बदलून घेऊ शकता. कोणतीही बँक या नोटा बदलून देण्यास नकार देऊ शकत नाही.

भारतीय रिझर्व्ह बँक अर्थात आरबीआयने 3 जुलै 2017 मध्ये एक नोटिफिकेशन काढलं होतं. हे नोटिफिकेशन ज्या नोटा फाटल्या आहेत, रंग उडाला आणि किंवा रंग लागलेल्या नोटांसाठी आहे.

कोणत्या नोटा बँका बदलून देणार नाहीत?

  • नोटिफिकेशननुसार, कोणत्याही नोटेवर एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत राजकीय संदेश लिहिला असेल, तर अशा नोटा बँका स्वीकारणार किंवा बदलून देणार नाहीत. आरबीआय नोटाबदली नियमावली 2009 नुसार, अशा नोटा रद्द केल्या जातील. कोणतीही बँक अशा नोटा घेणार नाहीत. ती नोट पूर्णत: रद्द होईल.
  • ज्या नोटा जाणीवपूर्वक फाडल्या असतील, त्या नोटा बँक बदलून देणार नाही. जाणीवपूर्वक फाडलेल्या नोटांची पडताळणी करणं अवघड असतं. चुकून फाटलेल्या नोटांना नीट पाहिल्यास त्या ओळखल्या जाऊ शकतात.

व्हायरल होणाऱ्या मेसेजमध्ये तथ्य नसल्याचं दिसून येतं. अर्थात याचा अर्थ असा नाही की तुम्ही बेभान होऊन खिशातील नोटांची काळजी न घेता होळी खेळा. होळी बिनधास्त खेळा, पण खिशातील नोटांची काळजी आवश्य घ्या.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *