एकेकाळी वडिल घरोघरी रंगकाम करुन चालवायचे कुटुंबाचा उदरनिर्वाह, आता थार-फॉर्च्युनरमधून करतोय प्रवास

सौरभ जोशी भारतातील फेमस यूट्यूबर आहे. सौरभचे यूट्युबवर 18.8 दशलक्ष सबस्क्रायबर आहेत. सौरभने 19 फेब्रुवारी 2019 रोजी आपल्या यूट्युब चॅनलची सुरवात केली होती.

एकेकाळी वडिल घरोघरी रंगकाम करुन चालवायचे कुटुंबाचा उदरनिर्वाह, आता थार-फॉर्च्युनरमधून करतोय प्रवास
यूट्युबर सौरभ जोशीImage Credit source: social
Follow us
| Updated on: Dec 14, 2022 | 4:14 PM

डेहराडून : आजकाल प्रत्येक जण सोशल मीडियावर सक्रिय असतो. सोशल मीडियावर रिल्स बनवण्याचा तर जणू ट्रेंडच सुरु आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येक जण सोशल मीडियाच्या अधीन गेला आहे. मात्र हाच सोशल मीडिया उत्पन्नाचे साधनही ठरत आहे. अनेक लोक या सोशल मीडियाच्या माध्यमातून भरपूर पैसेही कमावत आहेत आणि प्रसिद्धीही मिळवत आहेत. उत्तराखंडचा यूट्युबर सौरभ जोशीलाही आज कोणत्याही परिचयाची गरज नाही.

सौरभचे वडिल रंगकाम करुन उदरनिर्वाह चालवायचे

सौरभ जोशी जेवढा फेमस आहे तेवढेच त्याचे जीवनही संघर्षमय होते. सौरभचे वडिल रंगकाम करण्याचे काम करत होते. घरोघरी रंगकाम, पुटी, पीओपी करुन ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. यासाठी त्यांनी रोजंदारी म्हणून 200 ते 400 रुपये मिळत होते. मात्र मुलामुळे आज ते थार, फॉर्च्युनर आणि इनोव्हामध्ये प्रवास करत आहेत.

2019 मध्ये केली यूट्युब चॅनेलची सुरवात

सौरभ जोशी भारतातील फेमस यूट्यूबर आहे. सौरभचे यूट्युबवर 18.8 दशलक्ष सबस्क्रायबर आहेत. सौरभने 19 फेब्रुवारी 2019 रोजी आपल्या यूट्युब चॅनलची सुरवात केली होती. आतापर्यंत त्याने आपल्या चॅनलवर 1100 हून अधिक व्हिडिओ अपलोड केले आहेत.

हे सुद्धा वाचा

पहिल्या लॉकडॉऊनमध्ये व्लॉग बनवला

सौरभ बारावीत शिकत असताना त्याने आपले यूट्युब चॅनेल सुरु केले होते. त्यानंतर कोरोना महामारीच्या पहिल्या लॉकडाऊनमध्ये त्याने त्याच्या नावाने व्लॉग बनवला. या व्लॉगवर सर्वात आधी त्याने टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याचा व्हिडिओ अपलोड केला होता.

हा व्हिडिओला खूप पसंतीस उतरला होता. त्यावेळी त्याचे सहा दशलक्ष सबस्क्रायबर झाले होते. या व्हिडिओच्या व्ह्यूजला यूट्युब त्याला पैसे देत होते. तेव्हा सौरभ हरियाणात राहत होता. त्याचे शालेय शिक्षण तेथेच झाले. त्यानंतर जुलै 2021 मध्ये सौरभने हल्दानी येथे फ्लॅट घेतला आणि कुटुंबासोबत तेथे स्थलांतरित झाला.

पहाडी खाद्यपदार्थ जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवले

सौरभ जोशी याने उत्तराखंडमधील पहाडी खाद्यपदार्थ आणि निसर्गसौंदर्य देशाच्या आणि जगाच्या कानाकोपऱ्यात नेण्याचे काम त्याच्या व्लॉगद्वारे केले. तो भट्ट की चुरकाणी आणि डुबके यासह अनेक पहाडी पदार्थ त्याच्या व्लॉगमध्ये दाखवतो.

Non Stop LIVE Update
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....