अभिनंदन यांची पाकिस्तानात नार्को टेस्ट?

नवी दिल्ली : भारतीय विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची काल (1 मार्च) पाकिस्तानातून सुटका झाली. दुपारपर्यंत अभिनंदन वाघा बॉर्डरवरुन भारतात परतणार होते. मात्र, त्यांना भारतात परतण्यास रात्रीचे 9.15 वाजले. अभिनंदन यांना परतण्यास इतका उशीर का झाला, याबाबत माजी मेजर जनरल जीडी बक्षी यांनी खळबळजनक दावा केला आहे. “भारतीय विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची पाकिस्तानने नार्को …

अभिनंदन यांची पाकिस्तानात नार्को टेस्ट?

नवी दिल्ली : भारतीय विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची काल (1 मार्च) पाकिस्तानातून सुटका झाली. दुपारपर्यंत अभिनंदन वाघा बॉर्डरवरुन भारतात परतणार होते. मात्र, त्यांना भारतात परतण्यास रात्रीचे 9.15 वाजले. अभिनंदन यांना परतण्यास इतका उशीर का झाला, याबाबत माजी मेजर जनरल जीडी बक्षी यांनी खळबळजनक दावा केला आहे.

“भारतीय विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची पाकिस्तानने नार्को टेस्ट केली. या टेस्टसाठी अभिनंदन यांना सोडियम पेंटोथॉल इंजेक्शन देण्यात आलं. या इंजेक्शनचा प्रभाव संपेपर्यंत त्यांची पाकिस्तानने सुटका केली नाही. जेणेकरुन भारतात परतल्यानंतर अभिनंदन यांची वैद्यकीय चाचणी झाल्यास त्यांच्यावर सोडियम पेंटोथॉल इंजेक्शनचा वापर करण्यात आला, हे कळू नये.” असा दावा माजी मेजर जनरल जीडी बक्षी यांनी केला आहे.

अभिनंदन यांच्याकडून सोडियम पेंटोथॉल इंजेक्शनच्या माध्यमातून भारताच्या मिशनची माहिती उकलण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून करण्यात आला, असेही जीडी बक्षी यांनी म्हटले आहे.

“भारताची महत्त्वाची आणि संवेदनशील माहिती काढून घेण्यासाठी विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना पाकिस्तानने सोडियम पेंटोथॉल इंजेक्शन देऊन, त्यांची नार्को टेस्ट केली. भारताचे प्लॅन आणि मिशन जाणून घेण्याचा पाकने प्रयत्न केला.”, असाही दावा जीडी बक्षी यांनी केला.

वाचा: पाकिस्तानातून अभिनंदन यांना घेऊन येणारी ही महिला कोण?

“अभिनंदन यांच्याकडून माहिती काढण्यात पाकिस्तानला यश मिळाले की नाही, हे ठामपणे सांगता येत नाही. मात्र अभिनंदन यांना भारताकडे सोपवण्यात पाकिस्तानने केलेला उशीर, हीच गोष्ट स्पष्ट करते की, इंजेक्शनचा प्रभाव संपण्यासाठी पाकिस्ताने अभिनंदन यांना अधिक वेळ थांबवून ठेवले. त्यामुळे मायदेशी परतण्यास अभिनंदन यांना उशीर झाला.”, असे बक्षी म्हणाले.

नार्को टेस्टमध्ये सोडियम पेंटोथॉल इंजेक्शनचा वापर होतो!

नार्को टेस्टचा वापर कुणाही व्यक्तीकडून सत्य जाणून घेण्यासाठी केला जातो. गुन्हेगारी प्रकरणात न्यायालयाच्या परवानगीनंतरच नार्को टेस्ट केली जाते. या टेस्टमध्ये संबंधित व्यक्तीला ‘Truth Serum’ दिलं जातं, ज्यामुळे ती व्यक्ती खरं सांगते. या ‘Truth Serum’ मध्ये सोडियम पेंटोथॉल, इथेनॉल आणि स्कोपोल-अमाईनसह सायको-एक्टिव्ह ड्रग्जही दिले जातात. या सगळ्या गोष्टींमुळे ती व्यक्ती संमोहित होऊन, विचारलेल्या प्रश्नांची सत्य उत्तरे देते.

30 ते 40 सेकंदात परिणाम

सोडियम पेंटोथॉल इंजेक्शनचा परिणाम अगदी 30 ते 40 सेकंदांमध्ये होतो. नार्को टेस्टदरम्यान जास्त प्रमाणात हे इंजेक्शन दिल्यास, संबंधित व्यक्ती कोमात जाण्याची शक्यता असते. प्रसंगी ती व्यक्ती मृत्युमुखी पडण्याचीही भीती असते.

सोडियम पेंटोथॉलचा 3 ते 8 तास प्रभाव

नार्को टेस्टवेळी देण्यात येणाऱ्या सोडियम पेंटोथॉल इंजेक्शनचा 3 ते 8 तास प्रभाव राहतो. त्यामुळे या काळात ती व्यक्ती शुद्धी राहत नाही. त्यामुळे विचारलेल्या प्रश्नांची सत्य उत्तरे देते. नार्को टेस्टदरम्यान अनेकदा खोटी उत्तर मिळण्याची शक्यताही असते. नार्को टेस्टसाठी देण्यात आलेल्या ड्रग्जचा प्रभाव कमी असल्यास, संबंधित व्यक्ती प्रश्न विचारणाऱ्यांना खोटी उत्तरं देण्याचीही शक्यता असते.

संबंधित बातम्या :

दिल्लीत पोहोचताच विंग कमांडर अभिनंदन ताबिशला कडकडून भेटले!

जिनेव्हा करार नाही, या पाच गोष्टींमुळे अभिनंदन यांची सुटका ऐतिहासिक!

विंग कमांडर अभिनंदन यांचं BCCI कडून हटके स्वागत

प्रत्येकाच्या ओठावर एकच शब्द – Welcome Home Abhinandan

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *