सरकारी नोकरीची बंपर ऑफर, आयटीबीपीत 496 पदांची भरती

नवी दिल्ली : आपण सरकारी नोकरीचा शोध घेत असाल तर आपल्यासाठी ही मोठी संधी आहे. इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस दलात (आयटीबीपी) 496 पदांची भरती होणार आहे. त्यासाठी आपणही अर्ज करू शकता. आयटीबीपीमध्ये ‘मेडिकल ऑफिसर’ या पदासाठी जागा निघाल्या आहेत. यात सुपर स्‍पेशालिस्‍ट मेडिकल ऑफिसर, स्‍पेशालिस्‍ट मेडिकल ऑफिसर आणि मेडिकल ऑफिसर अशा श्रेणी आहेत. या 496 …

Government Job, सरकारी नोकरीची बंपर ऑफर, आयटीबीपीत 496 पदांची भरती

नवी दिल्ली : आपण सरकारी नोकरीचा शोध घेत असाल तर आपल्यासाठी ही मोठी संधी आहे. इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस दलात (आयटीबीपी) 496 पदांची भरती होणार आहे. त्यासाठी आपणही अर्ज करू शकता.

आयटीबीपीमध्ये ‘मेडिकल ऑफिसर’ या पदासाठी जागा निघाल्या आहेत. यात सुपर स्‍पेशालिस्‍ट मेडिकल ऑफिसर, स्‍पेशालिस्‍ट मेडिकल ऑफिसर आणि मेडिकल ऑफिसर अशा श्रेणी आहेत. या 496 पदांच्या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 2 एप्रिल 2019 पासून सुरू होणार आहे. अर्जाची शेवटची तारीख 1 मे 2019 आहे. तुम्हाला या पदांसाठी अर्ज करायचा असल्यास खाली दिलेली माहिती जरूर वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा.

विभागाचे नाव
आयटीबीपी

पदांची नावे 
सुपर स्‍पेशालिस्‍ट मेडिकल ऑफिसर, स्‍पेशालिस्‍ट मेडिकल ऑफिसर आणि मेडिकल ऑफिसर

एकूण पदांची संख्या
496 पदे

पात्रता
वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळी शैक्षणिक पात्रता निश्चित करण्यात आली आहे. या पात्रतांसाठी आयटीबीपीच्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्यावी.

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करण्याची वयोमर्यादाही वेगवेगळ्या पदासांठी वेगवेगळी आहे. यात सुपर स्‍पेशालिस्‍ट मेडिकल ऑफिसर पदासाठी सर्वाधिक वयाची मर्यादा 50 वर्षे, स्‍पेशालिस्‍ट मेडिकल ऑफिसर पदासाठी 40 वर्षे आणि मेडिकल ऑफिसर पदासाठी 30 वर्षे ठेवण्यात आली आहे.

कसा करणार अर्ज
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्यांनी आयटीबीपीची अधिकृत वेबसाईट recruitment.itbpolice.nic.in वर अर्ज भरावे.

अर्ज शुल्क

जनरल/ओबीसी: 400 रुपये
एससी/एसटी: कोणतेही शुल्क नाही

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *