रिक्षा चालकाने 2 वर्षात कोट्यावधींचा व्हिला घेतला, आयकर विभागाचा छापा

बंगळुरु : रिक्षा चालकाने चक्क 2 वर्षात कोट्यावधींचा ट्रिपलेक्स व्हिला खरेदी केल्याचा प्रकार समोर आला आहे. नल्लूरल्ली सुब्रामणी (37), असे या बंगळुरुमधील रिक्षाचालकाचे नाव आहे. ही माहिती समोर येताच आयकर खात्याने त्यांच्या घरावर छापा टाकला. नल्लूरल्ली सुब्रामणी याने बंगळुरुमध्ये 1 कोटी 60 लाख रुपयांचा ट्रिपलेक्स व्हिला खरेदी केला आहे. 16 एप्रिल रोजी आयकर विभागाने सुब्रामणीच्या जेटी …

रिक्षा चालकाने 2 वर्षात कोट्यावधींचा व्हिला घेतला, आयकर विभागाचा छापा

बंगळुरु : रिक्षा चालकाने चक्क 2 वर्षात कोट्यावधींचा ट्रिपलेक्स व्हिला खरेदी केल्याचा प्रकार समोर आला आहे. नल्लूरल्ली सुब्रामणी (37), असे या बंगळुरुमधील रिक्षाचालकाचे नाव आहे. ही माहिती समोर येताच आयकर खात्याने त्यांच्या घरावर छापा टाकला.

नल्लूरल्ली सुब्रामणी याने बंगळुरुमध्ये 1 कोटी 60 लाख रुपयांचा ट्रिपलेक्स व्हिला खरेदी केला आहे. 16 एप्रिल रोजी आयकर विभागाने सुब्रामणीच्या जेटी द्वाराकामयी कम्युनिटीतील घरावर छापा टाकला. छापेमारीत त्याच्या घरातून कोट्यावधींचे दागिने आणि संपत्तीची कागदपत्रे जप्त करण्यात आली. एका अधिकाऱ्याने सांगितले, ‘आम्ही याविषयी माहिती सार्वजनिक करु शकत नाही. हा छापा विश्वसनीय माहितीच्या आधारे टाकण्यात आला. हे प्रकरण बेनामी मालमत्तेचे वाटत आहे. याचा तपास सुरु आहे.’ कम्युनिटीच्या विकासकालाही आयकर विभागाने नोटीस पाठवली आहे. कम्युनिटीचे व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मी जेटी यांनी सांगितले, ‘आमच्याकडे जी माहिती आणि कागदपत्रे होती, ती आम्ही अधिकाऱ्यांना दिली आहेत. आम्ही पुढील तपासासाठीही तयार आहोत. ‘

‘अमेरिकेच्या महिलेच्या मदतीवर कोट्याधीश’

रिक्षाचालक नल्लूरल्ली सुब्रामणी यांच्या कोट्याधीश होण्यात एका 72 वर्षीय अमेरिकन महिलेचा हात असल्याचीही माहिती समोर येत आहे. अमेरिकी महिलेच्या मदतीनेच मी ही संपत्ती घेऊ शकल्याचे सुब्रामणीने सांगितले आहे. दुसरीकडे हेही सांगितले जात आहे, की राजकीय नेते त्यांचा बेकायदेशीर पैसा सुब्रामणीकडे ठेवत होते. त्यातूनच त्याने एवढी संपत्ती गोळा केली आहे.

‘आधी भाडे तत्वावर, मग थेट खरेदी’

लक्ष्मी जेटी म्हणाले, ‘सुब्रामणी 2013 मध्ये आपल्या रिक्षामध्ये एका अमेरिकेच्या महिलेसोबत आले होते. त्यावेळी त्यांनी हा व्हिला भाडे तत्वावर घेण्याबाबत विचारणा केली. त्यांना 30 हजार रुपयांच्या मासिक भाड्याच्या करारावर हा व्हिला देण्यात आला. 2015 मध्ये रिक्षाचालक सुब्रामणी यांनी हा व्हिला खरेदी केला. त्यासाठी त्यांनी 10 लाख रुपयांच्या 16 चेकद्वारे 1.6 कोटी रुपये दिले.’

‘सुब्रमणी यांना कधीही कामावर जाताना पाहिले नाही’

दरम्यान, या व्हिलामध्ये सुब्रमणीचा मुलगा आणि मुलगी दिमाखात राहत होते. ते एका इंटरनॅशनल शाळेमध्ये शिक्षण घेतात. शेजाऱ्यांनी सांगितलेल्या माहितीप्रमाणे, ‘सुब्रामणी नेहमी येथे पार्टीचे आयोजन करायचा. त्यावेळ अनेक स्थानिक नेतेही घरी यायचे.’ असे असले तरी सुब्रमणी यांना कधीही कामावर जाताना पाहिले नाही, असेही शेजाऱ्यांनी नमूद केले.

‘कम्युनिटीच्या मालकांसोबत वाद झाल्यामुळे छापेमारी’

सुब्रामणी यांनी आयकर छाप्यांमागे वेगळेच कारण असल्याचे सांगितले. ते म्हणाले, ‘ माझ्यासह अन्य काही व्हिला मालकांचा कम्युनिटी मालकांसोबत एक वाद सुरु आहे. कम्युनिटी मालकाने मला त्रास देण्यासाठीच छापेमारी करायला लावली. ही संपत्ती त्या अमेरिकन महिलेची देण आहे. त्या एका जीई कंपनीत काम करत होत्या. त्या माझ्याच रिक्षातून प्रवास करायच्या. त्यांनी मला मदत केली. त्यामुळेच मी हा व्हिला खरेदी करु शकलो.’

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *