VIDEO : पुन्हा पिवळ्या साडीवरील महिला चर्चेत, डान्स व्हिडीओ व्हायरल

लोकसभा निवडणुकी दरम्यान सोशल मीडियावर PWD ऑफिसर रीना द्विवेदी यांचे पिवळ्या साडीवरील फोटो व्हायरल झाले होते. यामुळे संपूर्ण देशात रीना द्विवेदी यांना प्रसिद्धी मिळाली होती.

VIDEO : पुन्हा पिवळ्या साडीवरील महिला चर्चेत, डान्स व्हिडीओ व्हायरल

मुंबई : लोकसभा निवडणुकी दरम्यान सोशल मीडियावर PWD ऑफिसर रीना द्विवेदी यांचे पिवळ्या साडीवरील फोटो व्हायरल झाले होते. यामुळे संपूर्ण देशात रीना द्विवेदी यांना प्रसिद्धी मिळाली होती. यानंतर पुन्हा आता सोशल मीडियावर रीना द्विवेदी यांची चर्चा सुरु झाली आहे. नुकताच टिक-टॉकवरील त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये त्या डान्स करताना दिसत आहेत. रीना यांचा हा व्हिडीओ यूट्यूबवरही अपलोड केला आहे.

व्हिडीओमध्ये रीना या डान्स करताना दिसत आहेत. त्यांनी पिवळ्या रंगाचा स्कर्ट घातला आहे आणि घरात डान्स करताना दिसत आहे. रीना द्विवेदी यांचा डान्स करतानाचा व्हिडीओ सर्वांच्या पसंतीस पडला आहे. मोठ्या प्रमाणात हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Reena Dwivedi (@reenadwivedi_pwd) on

याशिवाय रीना यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरही डान्सचा एक व्हिडीओ अपलोड केला आहे. त्यामध्येही त्या पिवळ्या साडीमध्ये दिसत आहे. रीना यांच्या पिवळ्या साडीने निवडणुकीत सर्वजण त्यांच्या सौंदर्याचे कौतुक करत होते. एका दिवसात रीना यांना इतक्या मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावरुन प्रसिद्धी मिळाली होती.

दरम्यान, नुकतेच अशी चर्चा सुरु होती की, रीना द्विवेदी बिग बॉस शोमध्येही येणार आहेत. रीना या लखनऊमध्ये पीडब्लूडीमध्ये कामाला असून त्या उत्तर प्रदेशच्या देवरिया येथे राहतात आणि त्यांना 13 वर्षाचा मुलगा आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *