भाजपविरोधी आघाडीला धक्का, कर्नाटकात माजी पंतप्रधानाचा पक्षच भाजपात विलीन होणार?

Karnataka BJP JDS : कट्टर विरोधक भाजप (BJP) आणि माजी पंतप्रधान एच डी देवगौडा यांची जनत दल (एस) (JDS) मोठा निर्णय घेण्याची चर्चा आहे.

भाजपविरोधी आघाडीला धक्का, कर्नाटकात माजी पंतप्रधानाचा पक्षच भाजपात विलीन होणार?
Follow us
| Updated on: Dec 21, 2020 | 12:57 PM

बंगळुरु : उत्तर भारतात शेतकरी आंदोलनाने राजकीय वातावरण ढवळून निघालं असताना, इकडे दक्षिण भारतात वेगळंच राजकारण रंगत आहे. कर्नाटक (Karnataka politics) विधानपरिषदेत सभापतींना खुर्चीवरुन खाली खेचल्याचं देशाने पाहिलं. या निमित्ताने जवळ आलेले कट्टर विरोधक भाजप (BJP) आणि माजी पंतप्रधान एच डी देवगौडा यांची जनत दल (एस) (JDS) मोठा निर्णय घेण्याची चर्चा आहे. माजी पंतप्रधान देवेगौडांचा (H D Deve Gowda) पक्ष जेडीएस थेट भाजपमध्येच विलीन होणार असल्याच्या चर्चा कर्नाटकात रंगल्या आहेत. मात्र सध्या तरी दोन्ही पक्षांकडून या चर्चा फेटाळल्या जात आहेत. (Rumors about BJP and JDS merger in Karnataka)

देशाच्या राजकारणात खळबळ उडवून देणाऱ्या घडामोडी नेहमीच दक्षिण भारतात घडत असतात. त्यातल्या त्यात कर्नाटकातील राजकारण तर यासाठीच ओळखलं जातं. जर देवेगौडा आणि त्यांचे सुपुत्र माजी मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी (H D Kumaraswamy) यांनी आपला पक्ष भाजपमध्ये विलीन केला तर तो भाजपविरोधी आघाडीसाठी मोठा धक्का असेल.

कर्नाटकात नेमकं काय घडलं?

कर्नाटकात सध्या बी एस येडीयुरप्पा यांच्या नेतृत्त्वातील भाजपचं सरकार आहे. कर्नाटक विधानपरिषेदत मंगळवारी 15 डिसेंबरला गोरक्षा विधेयकावरुन (Karnataka anti-cow slaughter bill) जोरदार राडा झाला. यावेळी काँग्रेसच्या आमदारांनी विधानपरिषेदच्या उपसभापतींना अक्षरश: सभागृहातून खेचून नेत बाहेर काढले. हा सगळा गोंधळ शांत करण्यासाठी सभागृहात मार्शल्सना पाचारण करावे लागलं होतं. कर्नाटक सरकारने गायींची रक्षा करणाऱ्या व्यक्तींच्या संरक्षणासाठी एक विधेयक सभागृहात मांडले होते. मात्र, या विधेयकामुळे गोरक्षकांना संरक्षण मिळेल, असा विरोधकांचा आक्षेप आहे.

Karnataka Congress MLCs in Karnataka Assembly forcefully remove the chairman of the legislative council

भाजप-जेडीएसची जवळीक नेमकी कशी?

या राड्यावेळी भाजप आणि जेडीएस एकत्र होते. भाजपने आणलेल्या गोरक्षा कायद्याला जेडीएसने पाठिंबा दिला होता. जी जेडीएस काँग्रेससोबत सत्तेत होती, काँग्रेसच्या पाठिंब्यामुळे एच डी कुमारस्वामी मुख्यमंत्री झाले, त्याच जेडीएसने भाजपला पाठिंबा कसा दिला, असा प्रश्न कर्नाटकात उपस्थित होत आहे. याच जवळीकीवरुन जेडीएस भाजपमध्ये विलीन होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

“विधेयकाला समर्थन नाहीच”

दरम्यान, भाजपने आणलेल्या गोरक्षा विधेयकाला आम्ही पाठिंबा देणार नाही अशी भूमिका माजी पंतप्रधान देवेगौडांनी 15 डिसेंबरला म्हटलं होतं. मात्र सभागृहातील भूमिका वेगळीच होती. हीच भूमिका भाजप-जेडीएसच्या जवळीकता वाढवणारी ठरली.

मूर्खपणा कधीही करणार नाही : कुमारस्वामी

भाजप-जेडीएस विलिनीकरणाची सर्व चर्चा सुरु असताना, जनता दल सेक्युलरचे प्रमुख कुमारस्वामी यांनी सोशल मीडियावर स्पष्टीकरण दिलं. जेडीएस हा कन्नडीगांचा स्वाभिमान बाळगणारा पक्ष आहे. आम्ही कधीही पक्ष विलिनीकरणाचा विचार करणार नाही. हा पक्ष जनतेचा आवाज आहे, विलिनीकरणासारखा मूर्खपणाचा विचार कधीही करु शकणार नाही. आम्ही गरज भासल्यास लोकांसाठी एखादंवेळी भाजपच्या एखाद्या मुद्द्याचं समर्थन देऊ. मात्र त्याचा अर्थ पक्ष विलीन करु असं नाही.

विधानसभा निवडणुकीपूर्वी कॉंग्रेस हाय कमांडने आम्हाला भाजपची बी टीम म्हणून आमची खिल्ली उडवली होती. मात्र प्रत्यक्ष मतदानानंतर काँग्रेस आमच्या दारात आली सोबत सत्ता स्थापनेचं निमंत्रण दिलं. जर आम्ही भाजपची बी टीम असतो, तर आम्ही काँग्रेससोबत कधीच सरकार स्थापन केलं नसतं. भाजपशी आमची कोणतीही जवळीक नाही. एखाद्या मुद्द्याला समर्थन म्हणजे पक्षविलीन नाही.

मला इथे स्पष्ट सांगायचं आहे की, दुसर्‍या पक्षात स्वत:चा पक्ष विलीन करुन आत्महत्या करण्याची परिस्थिती आतापर्यंत आलेली नाही. भविष्यातही अशाप्रकराचा निर्णय घेणार नाही, अशा आषयाचं ट्वीट कुमारस्वामींनी केलं.

(Rumors about BJP and JDS merger in Karnataka)

संबंधित बातम्या 

चार आमदारांनी धरलं आणि उपसभापतींना खुर्चीतून खेचलं, विधानपरिषदेत राड्याची हद्द 

Non Stop LIVE Update
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.