एअर स्ट्राईकवर प्रश्नचिन्ह, 26/11 ला संपूर्ण पाक जबाबदार नाही, सॅम पित्रोदांची मुक्ताफळं

नवी दिल्ली: काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे निकटवर्तीय आणि इंडियन ओव्हरसीज अर्थात काँग्रेसचे परदेशातील प्रमुख सॅम पित्रोदा यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.  पित्रोदा यांनी भारताच्या एअर स्ट्राईकमीधल मृतांवरुन प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहेच, शिवाय पुलवामा हल्ल्याप्रकरणी संपूर्ण पाकिस्तानला दोषी धरणं योग्य नसल्याचं म्हटलं आहे.  इतकंच नाही तर मुंबई हल्ल्यालाही संपूर्ण पाकिस्तान जबाबदार नसल्याची मुक्ताफळंही सॅम पित्रोदांनी …

, एअर स्ट्राईकवर प्रश्नचिन्ह, 26/11 ला संपूर्ण पाक जबाबदार नाही, सॅम पित्रोदांची मुक्ताफळं

नवी दिल्ली: काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे निकटवर्तीय आणि इंडियन ओव्हरसीज अर्थात काँग्रेसचे परदेशातील प्रमुख सॅम पित्रोदा यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.  पित्रोदा यांनी भारताच्या एअर स्ट्राईकमीधल मृतांवरुन प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहेच, शिवाय पुलवामा हल्ल्याप्रकरणी संपूर्ण पाकिस्तानला दोषी धरणं योग्य नसल्याचं म्हटलं आहे.  इतकंच नाही तर मुंबई हल्ल्यालाही संपूर्ण पाकिस्तान जबाबदार नसल्याची मुक्ताफळंही सॅम पित्रोदांनी उधळली आहेत.

सॅम पित्रोदा हे काँग्रेसचे महत्त्वाचे नेते आहेत. लोकसभेच्या 2019 च्या निवडणुकीत काँग्रेसच्या जाहीरनामा समितीचे सदस्य आहेत.

पित्रोदा म्हणाले, “पुलवामानंतर भारताने एअरस्ट्राईकमध्ये तीनशेपेक्षा जास्त लोकांना मारलं असेल तर ठिक आहे. पण त्याचे तथ्य आणि पुरावे दिले जाऊ शकतात?  भारतीय वायूदलाने पाकिस्तानमध्ये किती विध्वंस केला आणि त्यांच्यावर काय परिणाम झाला हे जाणण्याचा अधिकार प्रत्येक भारतीयाला आहे”

मी न्यूयॉर्क टाईम्स आणि विविध वृत्तपत्रांचे रिपोर्ट्स वाचले, त्यामुळे त्याबाबत अधिक जाणून घेण्याची इच्छा आहे. आपण खरंच हल्ला केला होता का? 300 लोक खरंच मारले गेले का? एक नागरिक म्हणून हे जाणून घेण्याचा मला अधिकार आहे, प्रश्न विचारणं हे माझं कर्तव्य आहे. मात्र त्याचा अर्थ असा होऊ नये की मी देशद्रोही आहे. तुम्ही म्हणता 300 जण मारले गेले आहेत, मात्र तिथे एकही मारला गेला नाही, असं जगभरातील मीडिया का म्हणत आहे, असा प्रश्न सॅम पित्रोदा यांनी उपस्थित केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पलटवार

“विरोधक आपल्या सैनिकांचा सातत्याने अपमान करत आहेत. मी तमाम भारतीयांना आवाहन करतो की, विरोधी पक्षातील नेत्यांना त्यांच्या या वक्तव्यांबाबत प्रश्न विचारा आणि त्यांना सांगा की, 130 भारतीय विरोधकांच्या या गोष्टी विसरणार नाहीत. भारत देश ठामपणे सैनिकांसोबत उभा आहे.” असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

“काँग्रेस अध्यक्षांचे सल्लागार आणि मार्गदर्शकांनी काँग्रेसतर्फे पाकिस्तानचा राष्ट्रीय दिन साजरा करायला सुरुवात केली आहे. भारतीय सैनिकांचं मनोबल खच्चीकरण केले जात आहे. निषेध!” असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

सॅम पित्रोदा यांनी प्रश्न उपस्थित केले असले तरी, 26/11 च्या हल्ल्यातील अतिरेकी पाकिस्तानचे होते हे जगाने मान्य केलं. भारताने तसे पुरावे पाकिस्तानला दिले आहेत.  पाकिस्तान दहशतवाद्यांना पोसत असल्याची कबुली पाकच्या माजी अध्यक्ष परवेज मुशर्रफ यांनी दिली होती. त्यामुळे संपूर्ण पाक जबाबदार नाही, हे सॅम पित्रोदा कसं काय म्हणून शकतात असा प्रश्न आहे.

दुसरीकडे पुलवामा हल्ल्याची जबाबदारी जैश ए मोहम्मद या संघटनेनी घेतली. त्या संघटनेचं मुख्यालयही पाकिस्तानात आहे. दहशतवादी संघटनांना पाकिस्तानच्या भूमीवर थारा मिळतो, सरकार आणि सैन्याकडून छुपी मदत मिळते मग संपूर्ण पाकिस्तान जबाबदार कसं नाही?

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *