वैफल्यग्रस्त माणसं कोणत्याही थराला जाऊ शकतात, सोमय्या,पडळकर आवर घालण्याबाहेर : संजय राऊत

वैफल्यग्रस्त माणसं कोणत्याही थराला जाऊ शकतात, सोमय्या,पडळकर आवर घालण्याबाहेर : संजय राऊत
संजय राऊत
Image Credit source: tv9

खासगीकरणाविरोधातील संप, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), भाजप, महाविकास आघाडीच्या नेत्यांची बदनामी, गोपीचंद पडळकर आणि किरीट सोमय्या यांच्याबद्दल संजय राऊत यांनी भाष्य केलं. 

संदीप राजगोळकर

| Edited By: Yuvraj Jadhav

Mar 28, 2022 | 9:58 AM

नवी दिल्ली : शिवसेना (Shivsena) संजय राऊत  (Sanjay Raut)यांनी नवी दिल्लीत विविध विषयांवर भाष्य केलं. खासगीकरणाविरोधातील संप, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), भाजप, महाविकास आघाडीच्या नेत्यांची बदनामी, गोपीचंद पडळकर आणि किरीट सोमय्या यांच्याबद्दल संजय राऊत यांनी भाष्य केलं.   सरकारचं धोरण सार्वजनिक उपक्रम विकण्याचं धोरण आहे. सार्वजनिक उपक्रम विकण्याचं धोरण आहे म्हणजेच देश विकण्याचं धोरण आहे त्याविरोधात संघटना आंदोलन करत आहेत. जोपर्यंत सार्वजनिक उपक्रमांना ताकद दिली जात नाही तोपर्यंत रोजगार वाढणार नाही. गेल्या 50 ते  60 वर्षात सर्वाधिक रोजगार सार्वजनिक उपक्रमांनी दिला आहे. सरकारी उद्योग संपवून दोन पाच खासगी उद्योगांना आपल्या मर्जीतल्या लोकांच्या ताब्यात देश द्यायचा. यानं त्यांची संपत्ती वाढेल. पर्यायानं भाजपची संपत्ती वाढेल, हे धोकादायक आहे, असं संजय राऊत म्हणाले. त्याविरोधात  संघटनांचं आंदोलन सुरु आहे, असं ते म्हणाले.

खोटेपणाचा कळस

जर तुम्ही हिंदुत्त्ववादाचा पुरस्कार करताय.  देव, देश आणि धर्म मानता असं म्हणताय तर प्रत्येकानं आपलं वर्तन काय आहे. आपण किती खरं बोलतो देवाच्या दरबारात हे तपासून घेतलं पाहिजे. महाराष्ट्रात ज्या प्रकारचा खोटेपणाचा कळस उभारला जातोय. विरोधीपक्षाकडून यथेच्छ बदनामी मोहीम राबवली जात आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या विरोधात जे राबवलं जातंय. या लफंगेगिरीला हिंदूत्त्वात स्थान नाही, असं संजय राऊत म्हणाले. खरं बोला, कधी कधी सध्या विरोधी पक्षाचं असं सुरु आहे की रेटून खोटं बोलण्यापेक्षा सहज आणि सत्य बोला, असं संजय राऊत म्हणाले. महाराष्ट्राची तीच परंपरा आहे, असं राऊत म्हणाले.

संजय राऊत काय म्हणाले?

प्रमोद सावंतांनी पाच लाख रोजगार निर्माण करावेत

महाराष्ट्र सरकारचं नाणार संदर्भात मतपरिवर्तन होईल, असं म्हटलंय. धर्मेंद्र प्रधान हे शिक्षणमंत्री आहेत त्यांनी शिक्षणावर बोलायला हवं. त्यांच्या काळात त्यांनी मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केला पण ते होऊ शकलं नाही, असं संजय राऊत म्हणाले.भारतात उत्तर पूर्व भागात हिंदू अल्पसंख्याक आहेत. सीमाभागात मराठी भाषिक अल्पसंख्यांक आहेत. त्यांच्या बद्दल सुप्रीम कोर्टात याचिका आहे. त्यांच्यावर अन्याय होणाऱ्याबद्दल कोणाला काही वाटत नाही, असं संजय राऊत म्हणाले. प्रमोद सावंत यांना आमच्या शुभेच्छा आहे. गोव्याच्या जनतेनं भाजपला बहुमता इतका कौल दिला आहे. प्रमोद सावंत यांनी पाच लाख रोजगार निर्माण करण्याची घोषणा केली होती ती पूर्ण करावी, असं संजय राऊत यांनी म्हटलंय.

दोन्ही माणसं आवर घालण्यापलीकडे

आदित्य ठाकरे आज सिंधुदुर्गमध्ये जात आहेत, ही चांगली बाब आहे. गोपीचंद पडळकर आणि किरीट सोमय्या यांचं प्रकरण आवर घालण्यापलीकडं गेलेली आहेत. दोन्ही माणसांबद्दल महाराष्ट्रातील जनता  निर्णय घेईल. शरद पवार यांच्या हस्ते अहिल्यादेवी होळकर होणाऱ्या पुतळ्याच्या लोकार्पणाला राजकीय विरोध चुकीचा आहे. वैफल्यग्रस्त माणसं कोणत्याही थराला जाऊ शकतात.

बिर्ला सारडा डायरी प्रकरणाचं काय झालं?

डायरी प्रकरण ऐकून गमंत वाटली. बिर्ला सारडा डायरी प्रकरण होतं. त्यामध्ये देशात सत्तेत असणाऱ्या भाजपला सध्या 25 कोटी, 30 कोटी रुपये देण्यात आले होते. सीबीआयनं डायरी हा विश्वासार्ह पुरावा नाही, असं सांगितलं होतं. भाजपचं नाव आल्यानंतर तसं सांगण्यात आलं होतं. केंद्रीय तपास यंत्रणांची भीती दाखवून धमकावण्याचं काम सुरु आहे. चंद्रकांत पाटील यांनी काल धमक्या दिल्या आहेत. खोट्या डायऱ्याही तयार केल्या जाऊ शकतात. मला भाजपच्या कार्यपद्धतीवर संशय आहे, असं देखील ते म्हणाले.

इतर बातम्या:

Bank : आजपासून बँक कर्मचाऱ्यांचा संप; कामकाज होणार प्रभावित सरकारच्या धोरणाविरोधात संघटनांचा आक्रमक पवित्रा

Bharat Bandh : बँकिंग क्षेत्रच नाही तर रेल्वे, टपाल, विमा क्षेत्रालाही संपाचा बसणार फटका

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें