VIDEO : गाडी चालवताना फोनवर बोलल्यामुळे पोलिसांनी थांबवलं, तरुणीचा रस्त्यावरच राडा

केंद्र सरकारने लागू केलेल्या नव्या मोटर वाहन कायद्यानुसार (Motor Vehicle Act) दिल्लीत प्रत्येकजण वाहन कायद्याचे नियम (Motor Vehicle Act) पाळताना दिसत आहे.

VIDEO : गाडी चालवताना फोनवर बोलल्यामुळे पोलिसांनी थांबवलं, तरुणीचा रस्त्यावरच राडा

नवी दिल्ली : केंद्र सरकारने लागू केलेल्या नव्या मोटर वाहन कायद्यानुसार (Motor Vehicle Act) दिल्लीत प्रत्येकजण वाहन कायद्याचे नियम (Motor Vehicle Act) पाळताना दिसत आहे. तसेच हे नियम प्रत्येकाने पाळावे यासाठी वाहतूक पोलिसांनाही (Traffic Police) अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. नुकतेच दिल्लीत एका तरुणीने वाहतूक पोलिसांसोबत अरेरावी केली आणि आत्महत्या करेन, अशी धमकीही तिने दिली. या घटनेचा व्हिडीओ मोबाईल कॅमेरात कैद झाला असून हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ही तरुणी स्कूटीवरुन ऑफिसला जात होती. तरुणीच्या स्कूटीची नंबर प्लेट तुटलेली आहे. हेल्मेटचा बँड लावलेला नव्हता आणि ती स्कूटी चालवताना मोबाईलचा वापर करत होती. त्यामुळे पोलिसांनी या तरुणीला अडवले. अडवल्यानतंर तरुणीने पोलिसांना चलान न कापण्याची विनंती केली. पण पोलिसांनी तिचे न ऐकल्यामुळे मुलीने पोलिसांसोबत अरेरावी केली.

व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे की, तरुणी आपली चुकी स्विकारत नसून पोलिसांवरच अरेरावी करत आहे. हा व्हिडीओ शनिवारचा (14 सप्टेंबर) असून दिल्लीतील काश्मिरी गेट आयएसबीटीजवळ ही घटना घडली, असल्याचं सांगितलं जात आहे.

वाहतूक पोलिसांसोबत अरेरावी करत या तरुणीने आपले हेल्मेट जोरात फेकून दिले. याशिवाय आत्महत्या करेन अशी धमकीही तिने दिली. या दरम्यान तरुणीने आपल्या आईला फोन करुन वाहतूक पोलीस चलान कापत असल्याचे सांगितले होते. जवळपास 20 मिनिटांच्या ड्रामानंतर पोलिसांनी तरुणीला चलान न कापताच सोडून दिले.

दरम्यान, काहीदिवसांपूर्वी नवी मुंबईतही एका तरुणीने वाहतूक पोलिसांसोबत अरेरावी केली होती. त्यासोबतच तिने पोलिसांना अपशब्द वापरले होते. त्या तरुणीचाही व्हिडीओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *