अमेठीत स्मृती इराणींना धक्का, सर्वात विश्वासू व्यक्तीची भाजपला सोडचिठ्ठी

अमेठी : भाजपने काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा बालेकिल्ला असलेल्या अमेठीत विजयासाठी रणनीती आखली आहे. पण त्याअगोदरच भाजपला धक्का लागलाय. अमेठीच्या भाजप उमेदवार स्मृती इराणी यांच्या सर्वात विश्वासू व्यक्तीने भाजपला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. काँग्रेसच्या प्रभारी प्रियांका गांधींनी भाजपचा महत्त्वाचा नेता फोडण्यात यश मिळवलंय. उत्तर प्रदेशची जबाबदारी सध्या प्रियांका गांधी सांभाळत आहेत. कोण आहेत …

अमेठीत स्मृती इराणींना धक्का, सर्वात विश्वासू व्यक्तीची भाजपला सोडचिठ्ठी

अमेठी : भाजपने काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा बालेकिल्ला असलेल्या अमेठीत विजयासाठी रणनीती आखली आहे. पण त्याअगोदरच भाजपला धक्का लागलाय. अमेठीच्या भाजप उमेदवार स्मृती इराणी यांच्या सर्वात विश्वासू व्यक्तीने भाजपला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. काँग्रेसच्या प्रभारी प्रियांका गांधींनी भाजपचा महत्त्वाचा नेता फोडण्यात यश मिळवलंय. उत्तर प्रदेशची जबाबदारी सध्या प्रियांका गांधी सांभाळत आहेत.

कोण आहेत रवी दत्त मिश्रा?

रवी दत्त मिश्रा हे अमेठी मतदारसंघात स्मृती इराणींचे सर्वात विश्वासू सहकारी मानले जायचे. पण त्यांनी काँग्रेसला साथ देण्याचा निर्णय घेतलाय. स्मृती इराणींचा अमेठी दौरा आणि रवी दत्त मिश्रा यांची साथ हे समीकरण असायचं. रवी दत्त मिश्रा यांनीच स्मृती इराणींना अमेठीत आणल्याचं बोललं जातं. रवी दत्त यापूर्वी समाजवादी पक्षाचं सरकार असतानाही मंत्रीही राहिलेले आहेत.

अमेठीत राहुल गांधी विरुद्ध स्मृती इराणी असा थेट सामना आहे. कारण, इथे सपा आणि बसपा यांच्या आघाडीने उमेदवार दिलेला नाही. 2014 च्या निवडणुकीत इते स्मृती इराणी यांनी राहुल गांधींची दमछाक केली होती. यावेळीही भाजपचं पारडं जड मानलं जातंय. मात्र मतदानापूर्वी प्रियांका गांधी यांनी नवी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे.

रवी दत्त मिश्रांची भाजपला सोडचिठ्ठी कशामुळे?

स्थानिक सूत्रांच्या मते, यावेळी अमेठीत राहुल गांधींसाठी धोका आहे. स्मृती इराणींचा वाढता जनाधार हा काँग्रेससाठी डोकेदुखी बनलाय. माजी पंतप्रधान राजीव गांधींपासून अमेठी हा काँग्रेससाठी प्रतिष्ठेचा मतदारसंघ राहिलेला आहे. स्मृती इराणींच्या सर्वात जवळच्याच व्यक्तीला फोडण्यात काँग्रेसने यश मिळवलंय. राहुल गांधी केरळमधील वायनाड या मतदारसंघातूनही लढत आहेत. अमेठीमध्ये लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात 6 मे रोजी मतदान होणार आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *