शहीद मी, टीव्ही 9 वर टेलिव्हिजन इतिहासातील सर्वात गौरवशाली मालिका!

टीव्ही 9 नेटवर्क ‘शहीद मी’ (Shaheed Me) ही देशातील सर्वात मोठी मालिका घेऊन भेटीला येत आहे. दर रविवारी सकाळी 11 वाजता तुम्ही टीव्ही 9 मराठीवर ही मालिका पाहू शकाल.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 16:37 PM, 17 Feb 2020
शहीद मी, टीव्ही 9 वर टेलिव्हिजन इतिहासातील सर्वात गौरवशाली मालिका!

टीव्ही 9 नेटवर्क ‘शहीद मी’ (Shaheed Me) ही देशातील सर्वात मोठी मालिका घेऊन भेटीला येत आहे. दर रविवारी सकाळी 11 वाजता तुम्ही टीव्ही 9 मराठीवर ही मालिका पाहू शकाल. (Shaheed Me)

एकता निर्माण करण्यासाठी आणि देशाला सुवर्ण भविष्याकडे नेण्यासाठी, तसंच संपूर्ण देशाला प्रेरणा देण्यासाठी आम्ही पुढाकार घेतला आहे. आम्हाला या पवित्र हेतूसाठी आपल्या समर्थनाची आवश्यकता आहे. टीव्ही 9 नेटवर्क ‘शहीद मी’ हा साप्ताहिक कार्यक्रम सुरू करत आहे. या कार्यक्रमाचा उद्देश आपल्या शहिदांच्या-हुतात्म्यांचा सन्मान करणे आणि त्यांच्या सर्वोच्च बलिदानाच्या आठवणी कायम ठेवणे हा आहे.

केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी “शहीद मी” या कार्यक्रमाच्या पहिल्या भागाचे प्रमुख अतिथी म्हणून मान्यता दिली आहे.

आपल्या पूर्वजांकडून मिळालेले हे राष्ट्र आहे. जे आपल्या सैन्य आणि शहीदांच्या अतुलनीय त्यागातून ऐक्याच्या धाग्यात बांधले गेले आहे. या शहीदांना सलाम करुया, त्यांच्या धगधगत्या आठवणींना उजाळा देऊया टीव्ही 9 च्या शहीद मी या कार्यक्रमातून, तेव्हा पाहायला विसरु नका, ‘शहीद मी’ हा कार्यक्रम दर रविवारी सकाळी 11 वाजता.