Shraddha Murder Case: नार्कोनंतर आज होणार आफताबची पोस्ट नार्को टेस्ट, काय असते ही चाचणी?

श्रद्धा हत्त्याकांडाचा उलगडा करण्यासाठी आज आफताबची पोस्ट नार्को टेस्ट करण्यात येणार आहे. ही चाचणी नेमकी कशी असते जाणून घेऊया.

Shraddha Murder Case: नार्कोनंतर आज होणार आफताबची पोस्ट नार्को टेस्ट, काय असते ही चाचणी?
श्रद्धा वालकर आणि आफताब पुनावालाImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Dec 02, 2022 | 11:08 AM

नवी दिल्ली,  संपूर्ण देशाला हादरवून सोडलेल्या श्रद्धा वालकर हत्त्या (Shraddha Murder Case) प्रकरणातला आरोपी आफताब पुनावाला सध्या तिहार तुरुंगात आहे. दिल्ली पोलीस या गुन्ह्याचा कसून तापास करीत आहे. प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी आफताबची (Aftab post Narco test) पॉलीग्राफ टेस्ट झाली, त्यानंतर काल त्याची नार्को टेस्ट करण्यात आली, ज्यामध्ये त्याने 50 प्रश्नांची उत्तरे दिली. मात्र त्यांनी काय सांगितले हे एफएसएलचा तपास अहवाल आल्यानंतरच समजेल. एफएसएल पथकाने नार्को चाचणीचा तपास अहवाल पोलिसांकडे सोपवला आहे. आज आफताबची पोस्ट नार्को टेस्ट केली जाईल, जी तिहार जेलमध्येच केली जाईल. नार्को टेस्ट केल्यानंतर पोस्ट नार्कोटेस्ट (Poat Narco Test) म्हणजे नेमके काय? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. जाणून घेऊया या चाचणीबद्दल.

पोस्ट नार्को टेस्ट म्हणजे काय?

आफताबच्या पोस्ट नार्को टेस्टसाठी एफएसएलने 4 सदस्यांची टीम तयार केली असून, ही टीम आज चौकशी करणार आहे. पॉलीग्राफ आणि नार्को टेस्ट प्रमाणेच पोस्ट नार्को टेस्टमध्ये प्रश्नोत्तरे केली जातात. पॉलीग्राफ टेस्टमध्ये विचारले जाणारे प्रश्न आणि नंतर नार्को टेस्टमध्ये विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे जुळतात आणि त्यानंतर पुढील तपास प्रक्रियेला पोस्ट नार्को टेस्ट म्हणतात.

पॉलीग्राफ आणि नार्को चाचणीपेक्षा वेगळी असलेली  पोस्ट नार्को चाचणी ही एक जटिल प्रक्रिया आहे, ज्यामध्ये गुन्हेगाराने पॉलिग्राफ आणि नार्कोमध्ये स्वतंत्रपणे सांगितलेल्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्याचा प्रयत्न केला जातो. या पडताळणी काही तसंच कालावधी लागतो. यामध्ये तपास अधिकारी सत्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतात.

हे सुद्धा वाचा

एफएसएलचे सहाय्यक संचालक डॉ. संजीव गुप्ता यांनी सांगितले की, शुक्रवारी आफताबची पोस्ट नार्को चाचणी केली जाईल आणि त्याच्या उत्तरांचे विश्लेषण केल्यानंतर तपास अहवाल सीलबंद पाकिटात न्यायालयाकडे सुपूर्द केला जाईल.

दोन तास चालली आफताबची नार्को चाचणी

फॉरेन्सिक सायकॉलॉजी विभाग एफएसएलच्या पथकाने आफताब पूनावालाची नार्को चाचणीदरम्यान दोन तास चौकशी केली, त्याने नार्को चाचणीत कोणत्या प्रश्नांची उत्तरे दिली, याबाबत सध्या कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. ही संपूर्ण प्रक्रिया अत्यंत गुप्त ठेवण्यात आली आहे. त्याचा तपास अहवाल तयार करून न्यायालयात सादर केला जातो. या तपास अहवालाच्या आधारे न्यायालय कारवाई करते.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.