शेतकऱ्याची मुलगी बनली एका दिवसाची जिल्हाधिकारी, महिलांविषयी घेतला मोठा निर्णय

अनंतूपरचे जिल्हाधिकारी गंधम चंद्रुडू यांनी या अनोख्या उपक्रमाचे आयोजन केले होते. 'बालिके भविष्यत' या उपक्रमांतर्गत श्रावणी या विद्यार्थिनीने जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले. महिलांसंबंधीचा महत्वाचा निर्णयदेखील तिने घेतला. (Sixteen-year-old Sravani took charge as Collector and District Magistrate of Anantapur from Gandham Chandrudu )

शेतकऱ्याची मुलगी बनली एका दिवसाची जिल्हाधिकारी, महिलांविषयी घेतला मोठा निर्णय

अनंतपूर : आंतरराष्ट्रीय मुलगी दिवसानिमित्त आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यामध्ये अनेक शाळकरी मुलींनी शासकीय अधिकारी आणि कर्मचारी म्हणून कामकाज पाहिले. या निमित्ताने मुलींना शासकीय कामकाजाचा जवळून अनुभव घेता आला. अनंतूपरचे जिल्हाधिकारी गंधम चंद्रुडू यांनी या अनोख्या उपक्रमाचे आयोजन केले होते. ‘बालिके भविष्यत’ या उपक्रमांतर्गत मुलींमधील आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न करण्यात आला. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी देखील या उपक्रमाचे कौतुक केले आहे.  (Sixteen-year-old Sravani took charge as Collector and District Magistrate of Anantapur from Gandham Chandrudu )

‘बालिके भविष्यत’ या उपक्रमांतर्गत शेतकरी कुंटुंबातील 16 वर्षीय श्रावणी हिने अनंतपूरचे जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले. श्रावणीचे वडील शेतकरी आहेत तर आई रोजंदारीवर कामाला जाते. श्रावणी सध्या कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयामध्ये शिक्षण घेत आहे.

श्रावणीने दिवसभराच्या कामकाजात दोन फाईल्सवर स्वाक्षरी केली. अनुसूचित जाती/ जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत एका पीडितेला 25 हजारांचे अनुदान तिने मंजूर केले. शासकीय महिला कर्मचाऱ्यांना रात्री 8 ते सकाळी 8 वाजेपर्यंत कार्यालयीन कामकाजाबद्दल फोन करु नयेत, हा निर्णय श्रावणीने घेतला.

शालेय विद्यार्थिंनी जिल्हाधिकाऱ्यांच्या उपक्रात सहभाग घेत गावातील शासकीय कर्मचारी ते महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी पदाचे कामकाज पाहिले. अनंतपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी राबवलेल्या या उपक्रमाचे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी कौतुक केले आहे.

उच्चस्तरावर काम करणाऱ्यासाठी मुलींना प्रोस्ताहन देणे गरजेचे असल्याचे जिल्हाधिकारी गंधम चंद्रुडू यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. सर्व क्षेत्रामध्ये महिलांना समान संधी मिळणे गरजेचे आहे. प्रशासन, राजकारण, कॉर्पोरेट, वैज्ञानिक क्षेत्रात महिलांचे प्रतिनिधीत्व गरजेचे असल्याचे मत जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.

संबंधित बातम्या :  

आंध्र प्रदेश सरकारचा मोठा निर्णय, विधान परिषद बरखास्त!

‘दिशा’ कायद्याची माहिती घेण्यासाठी गृहमंत्री अनिल देशमुख आंध्र प्रदेशच्या दौऱ्यावर

(Sixteen-year-old Sravani took charge as Collector and District Magistrate of Anantapur from Gandham Chandrudu )

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *