पाकिस्तानकडून अचानक गोळीबार, 24 वर्षीय जवान शहीद

श्रीनगर : पाकिस्तानच्या नापाक कुरापती सुरुच आहे. पाकिस्तानने केलेल्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनात यश पाल या भारताच्या 24 वर्षीय जवानाला वीरमरण आलं. राजौरी जिल्ह्यातील शेलिंग फॉरवर्ड भागात पाकिस्तानकडून मॉर्टर बॉम्बचाही वापर करण्यात आला. शिवाय गोळीबारही करण्यात आला. भारतीय जवानांकडूनही पाकिस्तानला सडेतोड उत्तर देण्यात आलं. पाकिस्तान आर्मीकडून सुंदरबनी सेक्टरमधील केरीमध्ये सकाळी पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं. यातच …

पाकिस्तानकडून अचानक गोळीबार, 24 वर्षीय जवान शहीद

श्रीनगर : पाकिस्तानच्या नापाक कुरापती सुरुच आहे. पाकिस्तानने केलेल्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनात यश पाल या भारताच्या 24 वर्षीय जवानाला वीरमरण आलं. राजौरी जिल्ह्यातील शेलिंग फॉरवर्ड भागात पाकिस्तानकडून मॉर्टर बॉम्बचाही वापर करण्यात आला. शिवाय गोळीबारही करण्यात आला. भारतीय जवानांकडूनही पाकिस्तानला सडेतोड उत्तर देण्यात आलं.

पाकिस्तान आर्मीकडून सुंदरबनी सेक्टरमधील केरीमध्ये सकाळी पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं. यातच रायफलमॅन यशपालला वीरमरण आलं. यशपाल हा जम्मू काश्मीरमधील उधमपूरचा रहिवासी होता.

पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय सैन्याकडून दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्याची मोहिम काश्मीरमध्ये सुरु आहे. पण दुसरीकडे पाकिस्तान सैन्याकडून जवानांवर गोळीबार केला जात आहे. जानेवारीपासून आतापर्यंत पाकिस्तानने 110 वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *