शरजील इमाम आणि उमर खालिद यांच्या अडचणीत वाढ; 930 पानांचं पुरवणी आरोपपत्रं दाखल

जवाहरलाल नेहरु विद्यापीठ अर्थात जेएनयूचा स्कॉलर शरजील इमाम, JNU चा माजी विद्यार्थी नेता उमर खालिद आणि फैजान खान आणखीनचं अडचणीत सापडण्याची चिन्हे आहेत. (special cell filed supplementary chargesheet against sharjeel imam and umar khalid)

शरजील इमाम आणि उमर खालिद यांच्या अडचणीत वाढ; 930 पानांचं पुरवणी आरोपपत्रं दाखल
Follow us
| Updated on: Nov 22, 2020 | 10:44 PM

नवी दिल्ली: जवाहरलाल नेहरु विद्यापीठ अर्थात जेएनयूचा स्कॉलर शरजील इमाम, JNU चा माजी विद्यार्थी नेता उमर खालिद आणि फैजान खान आणखीनचं अडचणीत सापडण्याची चिन्हे आहेत. दिल्ली हिंसेप्रकरणी या तिघांविरोधात दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने 930 पानांचं पुरवणी आरोपपत्रं दाखल केलं आहे. या तिघांवरही विविध कलमाखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहे. (special cell filed supplementary chargesheet against sharjeel imam and umar khalid)

दिल्ली दंगलप्रकरणी या तिघांविरोधात कडकड्डूमा कोर्टात स्पेशल सेलने हे पुरवणी आरोपपत्रं दाखल केलं आहे. त्यात 190 पानांचं आरोपपत्रं असून 733 पानांचे दस्तऐवज आहेत, असं दिल्ली पोलिसांनी सांगितलं.

फैजान खानविरोधातही आरोपत्रं दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर हिंसेत सहभागी झालेल्या लोकांना सीम कार्ड मिळवून दिल्याचा आरोप आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात भादंवि कलम 13/16/17/18 यूएपीए कायदा, 120B, 109, 114,201, 124A, 147,148,149, 153A, 186, 420 सह अनेक गंभीर कलमांतर्गत आरोपपत्रं दाखल करण्यात आलं आहे. या गुन्ह्याचा एफआयआर दिल्ली गुन्हे अन्वेषण विभागाने दाखल केला होता. त्याचा तपास दिल्ली पोलिसांचा स्पेशल सेल करत आहे.

केंद्रीय गृहमंत्रालयाने 6 नोव्हेंबर रोजी उमर खालिद यांच्या विरोधात यूएपीए कायद्यांतर्गत खटला चालवण्यास परवानगी दिली होती. फेब्रुवारी महिन्यात उत्तरपूर्व दिल्लीत हिंसाचार झाला होता. उमर खालिद यांना त्या दंगली प्रकरणी UAPA कायद्यांतर्गत 13 सप्टेंबरला अटक करण्यात आली होती. अटकेनंतर उमरला 10 दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली होती. दिल्ली विशेष न्यायालयाने पोलीस कोठडीनंतर उमर यांना 22 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी ठोठावली होती.

दिल्ली पोलिसांनी उमर खालिद विरोधात 6 मार्चला चार्जशीट दाखल केली होती. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौऱ्यावेळी नागरिकांनी रस्त्यावर येऊन रास्ता रोको करण्याचे आवाहन उमर खालिद यांनी केले होते. त्यावेळी उमर यांनी दोन ठिकाणी प्रक्षोभक भाषण केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. (special cell filed supplementary chargesheet against sharjeel imam and umar khalid)

संबंधित बातम्या:

दिल्ली हिंसेप्रकरणी उमर खालिद अडचणीत; UAPA अंतर्गत खटला चालणार

दिल्ली हिंसाचार पूर्वनियोजित, प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक आरोप

Umar Khalid : जेएनयूचा माजी विद्यार्थी उमर खालिदला क्राईम ब्रँचकडून अटक

(special cell filed supplementary chargesheet against sharjeel imam and umar khalid)

Non Stop LIVE Update
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.