SBI च्या 42 कोटी ग्राहकांसाठी बँकेकडून मोठं गिफ्ट

तुमचे अकाऊंट स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये (एसबीआय) असेल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांना गृह कर्जावर आणि वाहन कर्जावर मोठी सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे.

SBI च्या 42 कोटी ग्राहकांसाठी बँकेकडून मोठं गिफ्ट

नवी दिल्ली : तुमचे अकाऊंट स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये (एसबीआय) असेल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांना गृह कर्जावर आणि वाहन कर्जावर मोठी सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. याचा फायदा एकूण 42 कोटी एसबीआय ग्राहकांना होणार आहे. विशेष म्हणजे हा निर्णय आजपासून (10 जुलै) लागू करण्यात येणार आहे. त्यानुसार एसबीआयने गृह आणि वाहन कर्जावरील व्याज दरात घट केली आहे.

भारतीय स्टेट बँकेने आपल्या सर्व कर्जावर 0.05 टक्के व्याज दराने कपात केली आहे. यामुळे गृह कर्जावरील व्याज दर 8.40 टक्के झाला आहे. एसबीआयने चार महिन्यात सलग तिसऱ्यांदा व्याज दरात घट केली आहे. यापूर्वीही बँकेने एप्रिल आणि मे मध्ये व्याजाचे दर घटवले होते. त्यावेळी एसबीआयने कर्जावरील व्याज दरात 0.10 टक्क्यांनी घट केली होती.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रेपो रेटमध्ये कपात केल्यामुळे एसबीआयच्या व्याज दरात बदल करण्यात आला आहे. याचाच अर्थ जेव्हा कधीही आरबीआय रेपो रेटमध्ये बदल करेल, तेव्हा बँकेच्या व्याज दरातही वाढ किंवा घट होईल.

रेपो रेटमध्ये एकानंतर एक असे तीन वेळा 0.75 टक्के घट केल्यानंतर बँकेकडून याचा लाभ ग्राहकांना मिळेल, अशी अपेक्षा केली जात आहे, असं आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सांगितले.

विशेष म्हणजे फक्त एसबीआयच नव्हे तर बँक ऑफ महाराष्ट्र, कॉर्पोरेशन बँक, ओरिएंटल बँक आणि आयडीबीआय बँकने आपल्या एमसीएलआर दरातही 0.05 ते 0.010 टक्के घट केली आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *