SBI बँकेत 3 हजार 850 रिक्त जागा, 16 ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार

कोरोना विषाणूमुळे संपूर्ण जगावर आर्थिक संकट निर्माण झाले (State Bank of India Jobs) आहे.

SBI बँकेत 3 हजार 850 रिक्त जागा, 16 ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार

मुंबई : कोरोना विषाणूमुळे संपूर्ण जगावर आर्थिक संकट निर्माण झाले (State Bank of India Jobs) आहे. त्यात जगभरात आतापर्यंत अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. याच दरम्यान आता स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) ऑफिसर पदांसाठी भर्ती सुरु केली आहे. 3 हजार 850 पदांसाठी ही भरती असणार आहे (State Bank of India Jobs).

एसबीआयच्या अधिकृत वेबसाईटवर ऑफिसर पदाच्या भरतीचे नोटिफिकेश जारी केले आहे. भारतीय स्टेट बँकेच्या नोटिफिकेशनच्या माध्यमातून या वर्षी 3 हजार 850 सीबीओ (सर्कल बेस्ड ऑफिसर) पदांची भरती केली जाणार आहे.

उमेदवार एसबीआयच्या वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या लिंकच्या माध्यमातून 27 जुलै 2020 ते 16 ऑगस्ट 2020 च्या दरम्यान या पदांसाठी अर्ज करु शकतात.

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर 

अर्ज करण्यासाठी उमेदवाराची पात्रता

1) उमेदवाराचे वय 30 वर्षांपेक्षा (01-08-2020 पर्यंत) अधिक नसावे.

2) उमेदवार मान्यता प्राप्त शिक्षण संस्थेतून पदवीधर असावा.

3) राज्यातील जागांवर अर्ज करणाऱ्या उमेदवाराला तेथील स्थानिक भाषेची माहिती असावी. त्यासाठी पुरावा म्हणून त्यांना 10 वी किंवा 12 वीचा निकाल दाखवावा लागेल.

4) ज्या उमेदवाराला शेड्यूल्ड कमर्शिअल बँक किंवा रिजनल रुरल बँकेमध्ये कमीत कमी दोन वर्षांचा अनुभव असेल तर तो अर्ज करु शकतो.

5) याशिवाय CIBIL किंवा इतर बाहेरच्या एजेन्सीमधील अहवालात डिफॉल्टर म्हणून घोषित केले असल्यास अशा उमेदवारांना अपात्र मानले जाईल.

दरम्यान, नुकतेच काहीदिवसांपूर्वी ईृ-कॉमर्स कंपनी अमेझॉननेही भारतात 20 हजार तात्पुरत्या स्वरुपाच्या नोकऱ्या उपलब्ध करणार आहे, अशी घोषणा कंपनीकडून करण्यात आली आहे. या नोकऱ्या कंपनी ग्राहकांच्या सेवेनुसार देणार आहे. या सर्व नव्या नोकऱ्या देशातील हैद्राबाद, पुणे, नोएडा, कोलकत्ता, जयपूर, चंदीगढ, मंगळूर, इंदोर, भोपाळ, कोइम्बतुर आणि लखनऊ या 11 शहरात दिल्या जाणार आहेत.

संबंधित बातम्या :

Amazon India : अ‍ॅमेझॉनकडून मोठी घोषणा, भारतात 20 हजार नोकऱ्या उपलब्ध करणार

नोकऱ्या गेल्या असतील, पगार कपात झाली असेल तर आम्हाला संपर्क साधा, मनसेचं तरुणांना आवाहन

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *