सुती साडी, खांद्यावर छोटीशी बॅग, कोट्यवधींची मालकीण साध्या अंदाजात पोहोचली कुंभमेळ्यात , नाव ऐकून तुम्हीही..

गेल्या आठवड्यापासून उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये सुरू झालेल्या कुंभमेळ्यामध्ये देशभरासह विदेशातील लाखो पर्यटकही सहभागी झाले आहेत. प्रयागराजमधील महाकुंभमेळ्यात कोट्यवधींच्या संपत्तीच्या मालकीण असलेल्या सुधा मूर्ती यांचा साधा आणि विनम्र सहभाग सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. साधी साडी आणि छोटीशी बॅग घेऊन त्या कुंभमेळ्यात दाखल झाल्या.

सुती साडी, खांद्यावर छोटीशी बॅग, कोट्यवधींची मालकीण साध्या अंदाजात पोहोचली कुंभमेळ्यात , नाव ऐकून तुम्हीही..
सुधा मूर्ती
Follow us
| Updated on: Jan 22, 2025 | 1:20 PM

गेल्या आठवड्यापासून ( 13 जानेवारी) उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये सुरू झालेल्या महाकुंभमेळ्याचीच सर्वत्र चर्चा सुरू आहे.एकूण 45 दिवस चालणाऱ्या या कुंभमेळयात देशभरासह विदेशातील लाखो लोकांनी हजेरी लावली असून येत्याकाळातही अनेक भाविक हजर राहणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील लवकरच या कुंभमेळ्यासाठी हजर राहणार आहेत. अशातच आता प्रसिद्ध लेखिका, कोट्यावधी लेखिका सुधा मूर्ती याही या कुंभमेळ्यासाठी हजर राहिल्या आहेत. कोट्यवधींची संपत्ती असूनही साधीशी साडी, खांद्यावर छोटीशी बॅग अशा साध्या पेहरावात त्याचा कुंभमेळ्यासाठी दाखल झाल्या आहेत. त्यांचा साधा सोपो, कोणताही बडेजाव नसलेला अंदाज पाहून सर्वच आश्चर्यचकित झाले. यावेळी त्यांनी आपण 3 दिवस संगमावर स्नान करणार असल्याचं तसंच आपल्या पूर्वजांसाठी तर्पण करणार असल्याचंही नमूद केलं.

या कुंभमेळ्यासाठी मी खूपच उत्साहित आहे, 144 वर्षांतून एकदाच हा योग येतो. मला खूप आनंद , उत्साह वाटतोय.मी तीन दिवस या कुंभमेळ्यासाठी आले असून संधि मिळाली तर गंगेत , संगमात मी जरूर डुबकी घेऊन, असे सुधा मूर्ती यांनी नमूद केलं. मला कुंभमेळ्यात सहभागी होता आलं, याचा आनंद आहे, असंही त्यांनी नमूद केलं.

नारायण मूर्ती-सुधा मूर्ती यांची संपत्ती

इन्फोसिसचे संस्थापक आणि सुधा मूर्ती यांचे पती नारायण मूर्ती यांची संपत्ती 5 अब्ज डॉलर्स (सुमारे 36,690 कोटी रुपये) आहे. एवढी संपत्ती असूनही जोडपं अतिशय साधं, सोपं जीवन जगतात. विशेष म्हणजे, सुधा मूर्ती यांनी गेल्या 30 वर्षात त्यांच्या कमाईतून कधीही नवीन साडी खरेदी केली नाही आणि त्या नेहमी साधी साडी नेसतात.

शाही स्नान कधी ?

13 जानेवारी रोजी सुरू झालेला कुंभमेळा 26 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. दररोज मोठ्या संख्येने भाविक महाकुंभात सहभागी होत आहेत. येत्या काही काळात भाविकांची संख्या आणखीनच वाढण्याची शक्यता आहे. 29 जानेवारी मौनी अमावस्येच्या दिवशी दुसरे शाही स्नान पार पडणार आहे. तर 3 फेब्रुवारीला वसंत पंचमीच्या दिवशी तिसरं, 12 फेब्रुवारी रोजी माघी पौर्णिमा असून त्या दिवशी चौथं आणि 26 फेब्रुवारी म्हणजेच महाशिवरात्रीच्या दिवशी पाचवे अर्थात शेवटचं शाही स्नान होणार आहे.

'ता उम्र गालिब हम यही भूल करते रहे... फडणवीसांचा राहुल गांधींवर निशाणा
'ता उम्र गालिब हम यही भूल करते रहे... फडणवीसांचा राहुल गांधींवर निशाणा.
Delhi Election Result : दिल्लीतील पराभवानंतर काय म्हणाले अरविंद केजरीव
Delhi Election Result : दिल्लीतील पराभवानंतर काय म्हणाले अरविंद केजरीव.
EVM वर बोलणारी तीन माकडं आज गायब - नितेश राणेंचा हल्लाबोल
EVM वर बोलणारी तीन माकडं आज गायब - नितेश राणेंचा हल्लाबोल.
संजय राऊत म्हणजे बडबड बहाद्दर - गिरीश महाजनांनी घेतला समाचार
संजय राऊत म्हणजे बडबड बहाद्दर - गिरीश महाजनांनी घेतला समाचार.
अहंकार रावण का भी नहीं बचा था - स्वाती मालीवाल यांचा ट्विटमधून निशाणा
अहंकार रावण का भी नहीं बचा था - स्वाती मालीवाल यांचा ट्विटमधून निशाणा.
Delhi Election Result : आपसाठी मोठा धक्का, अरविंद केजरीवाल पराभूत
Delhi Election Result : आपसाठी मोठा धक्का, अरविंद केजरीवाल पराभूत.
आम आदमी पक्षाच्या पराभवानंतर अण्णा हजारे काय म्हणाले ?
आम आदमी पक्षाच्या पराभवानंतर अण्णा हजारे काय म्हणाले ?.
Delhi Election Result : आपच्या सत्तेला भाजपकडून सुरूंग
Delhi Election Result : आपच्या सत्तेला भाजपकडून सुरूंग.
जोपर्यंत अमित शाह तोपर्यंत शिंदे गट - संजय राऊत भडकले
जोपर्यंत अमित शाह तोपर्यंत शिंदे गट - संजय राऊत भडकले.
दिल्लीत कोणाची सत्ता येणार ? आजी-माजी मुख्यमंत्री पिछाडीवर
दिल्लीत कोणाची सत्ता येणार ? आजी-माजी मुख्यमंत्री पिछाडीवर.