चाकू घेऊन संसदेत घुसण्याचा प्रयत्न, राम रहिमच्या भक्ताला अटक

बलात्कार आणि खूनाच्या गुन्ह्यातील दोषी राम रहिमच्या भक्ताने सोमवारी (2 सप्टेंबर) चाकुसह संसदेत घुसण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे एकच खळबळ माजली. या प्रकाराने संसदेच्या सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्न उपस्थित होत आहेत. आरोपी युवकाचं नाव सागर असं सांगितलं जात आहे. त्याला संसदेच्या गेट क्रमांक 1 मधून आत प्रवेश करताना अटक करण्यात आली.

चाकू घेऊन संसदेत घुसण्याचा प्रयत्न, राम रहिमच्या भक्ताला अटक

नवी दिल्ली: बलात्कार आणि खूनाच्या गुन्ह्यातील दोषी राम रहिमच्या (Gurmeet Ram Rahim Singh) भक्ताने सोमवारी (2 सप्टेंबर) चाकुसह संसदेत घुसण्याचा (Indian Parliament) प्रयत्न केला. त्यामुळे एकच खळबळ माजली. या प्रकाराने संसदेच्या सुरक्षा व्यवस्थेवरही (Parliament Security) प्रश्न उपस्थित होत आहेत. आरोपी युवकाचं नाव सागर असं सांगितलं जात आहे. त्याला संसदेच्या गेट क्रमांक 1 मधून आत प्रवेश करताना अटक करण्यात आली. पोलीस संबंधित तरुणाची कसून चौकशी करत आहेत. या तरुणाने राम रहीमचा (Gurmeet Ram Rahim Singh) भक्त असल्याची माहिती दिली आहे.

संसद भवनातील सुरक्षारक्षकांनी घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला अटक केल्यानंतर दिल्ली पोलिसांना (Delhi Police) याची माहिती दिली. पोलिसांनी तरुणाची कसून चौकशी सुरू केली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून चाकू जप्त केला.

संसद परिसरात घुसखोरी करताना पकडल्यानंतर आरोपी तरुणाने राम रहीमच्या नावाच्या घोषणा दिल्याचंही सांगितलं जात आहे. चौकशीत त्याने दिल्लीतील लक्ष्मी नगर परिसरात राहत असल्याचं सांगितलं.

 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *