मोदींविरोधात 2019 मध्ये लढायची होती निवडणूक, पण उमेदवारी अर्जच बाद; अर्जाच्या वैधतेवर मंगळवारी न्यायालयाचा फैसला

सीमा सुरक्षा दलाचे माजी सैनिक तेजबहादूर (Tejbahadur) यांनी दाखल केलेल्या याचिकेवर मंगळवारी निकाल देण्यात येणार आहे.

मोदींविरोधात 2019 मध्ये लढायची होती निवडणूक, पण उमेदवारी अर्जच बाद; अर्जाच्या वैधतेवर मंगळवारी न्यायालयाचा फैसला
Follow us
| Updated on: Nov 24, 2020 | 12:30 AM

नवी दिल्ली : सीमा सुरक्षा दलाचे माजी सैनिक तेजबहादूर (Tejbahadur) यांनी दाखल केलेल्या याचिकेवर मंगळवारी निकाल देण्यात येणार आहे. तेजबहादूर यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याविरोधात वाराणसी (Waranasi) येथून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. (supreme court decision on tejbahadur waraansi election nomination)

मात्र, निवडणूक आयोगाने त्यांचा उमेदवारी अर्ज रद्द केला होता. निवडणूक आयोगाच्या याच निर्णयाविरोधात  तेजबहादूर यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्या याचिकेवर मंगळवारी सर्वोच्च न्यायालय निकाल देणार आहे.

सरन्यायाधीश सरद बोबडे, न्यायमूर्ती ए. एस. बोपन्ना, न्यायमूर्ती वी रामासुब्रमणियन यांच्या खडंपीठाने 18 नोवेंबरला तेजबहादूर यांच्या याचिकेवरील सुनावणी पूर्ण केली होती. या याचिकेवर आता मंगळवारी निकाल देण्यात य़ेणार आहे.

तेजबहादूर यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत वाराणसीमधून समाजवादी पक्षाच्या तिकिटावर उमेदवारी अर्ज भरला होता. मात्र, निवडणूक आयोगाने अर्जात नोकरीतून निलंबित झाल्याचं योग्य कारण दिलं नसल्याचं सांगत त्यांचा उमेदवारी अर्ज रद्द केला. यानंतर तेजबहादूर यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. मात्र, तेथे त्यांची याचिका फेटाळण्यात आली. यानंतर तेजबहादूर यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी घेण्यात आली.

कोण आहेत माजी सैनिक तेजबहादूर?

बीएसएफचे माजी सैनिक तेजबहादूर (BSF constable Tejahadur) यांनी सीमेवर तैनात जवानांना मिळणाऱ्या निकृष्ट दर्जाच्या जेवनाचा मुद्दा उपस्थित करणारा एक व्हिडीओ 2017 मध्ये सोशल मीडियावर पोस्ट केला होता. यानंतर ते देशपातळीवर चर्चेत आले. त्यांच्या या व्हिडीओनंतर सैन्य दलाने शिस्तभंगाचा आरोप करत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. यानंतर तेजबहादूर यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. यावेळी सुरुवातीला ते अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार होते. नंतर समाजवादी पक्षाने त्यांना आपल्या पक्षातर्फे उमेदवारी दिली. मात्र, निवडणूक आयोगाने त्यांचा उमेदवारी अर्जच रद्दबातल ठरवला.

संबंधित बातम्या :

निकृष्ट अन्नाचा मुद्दा उपस्थित करणारा जवान मोदींविरोधात रिंगणात

वाराणसीतून मोदींविरोधात लढणाऱ्या तेजबहादूर यांची उमेदवारी रद्द

पंतप्रधान मोदींच्या खासदारकीला आव्हान, सर्वोच्च न्यायालयाने माजी सैनिक तेजबहादूर यांना फटकारलं

(supreme court decision on Tejbahadur waraansi election nomination)

Non Stop LIVE Update
राणा दाम्पत्य अडसूळ कुटुंबीयांच्या घरी, नवनीत राणांना पाठिंबा मिळणार?
राणा दाम्पत्य अडसूळ कुटुंबीयांच्या घरी, नवनीत राणांना पाठिंबा मिळणार?.
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?.
मतांसाठी कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी...दादा सापडले वादात
मतांसाठी कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी...दादा सापडले वादात.
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?.
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत.
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल.
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण...
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण....
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा.
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार.
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका.