एकच मुद्दा कितीवेळा ऐकायचा? व्हीव्हीपॅट प्रकरणी कोर्टाने विरोधकांना खडसावलं

नवी दिल्ली : देशात सध्या लोकसभा निवडणुकांचं वातावरण आहे. पाचव्या टप्प्यातील मतदान नुकतंच पार पडलं. या टप्प्यातील मतदानामधील व्हीव्हीपॅट आणि ईव्हीएमच्या मतांच्या जुळवणीसाठी विरोधकांच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने विरोधकांची ही फेरविचार याचिका फेटाळून लावली. ही याचिका टीडीपी, काँग्रेस यांच्यासह 21 विरोधी पक्षांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयात आज …

Supreme court rejected the review petition, एकच मुद्दा कितीवेळा ऐकायचा? व्हीव्हीपॅट प्रकरणी कोर्टाने विरोधकांना खडसावलं

नवी दिल्ली : देशात सध्या लोकसभा निवडणुकांचं वातावरण आहे. पाचव्या टप्प्यातील मतदान नुकतंच पार पडलं. या टप्प्यातील मतदानामधील व्हीव्हीपॅट आणि ईव्हीएमच्या मतांच्या जुळवणीसाठी विरोधकांच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने विरोधकांची ही फेरविचार याचिका फेटाळून लावली. ही याचिका टीडीपी, काँग्रेस यांच्यासह 21 विरोधी पक्षांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयात आज झालेल्या सुनावणीवेळी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू, डी. राजा, संजय सिंह आणि फारुख अब्दुल्ला हे उपस्थित होते.

ईव्हीएमला व्हीव्हीपॅट यंत्रणा जोडलेली असते. त्यामध्ये मतदाराने कुणाला मतदान केलं याची प्रत्यक्ष नोंद होते. त्यामुळे व्हीव्हीपॅट चिठ्ठ्या आणि ईव्हीएममधील मतं यांची जुळवणी करण्यात यावी. तसेच, विधानसभा क्षेत्रातील 50 टक्के व्हीव्हीपॅट चिठ्ठ्या आणि ईव्हीएम मतांची जुळवणी करण्याचे आदेश न्यायालयाने निवडणूक आयोगाला द्यावे, अशी मागणी विरोधकांनी केली होती.

“न्यायालय हा मुद्दा पुन्हा पुन्हा का ऐकून घेईल, न्यायालय या प्रकरणात हस्तक्षेप करणार नाही”, असं खडसावत सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती रंजन गोगोई यांनी ही याचिका फेटाळून लावली. सर्वोच्च न्यायालयाने व्हीव्हीपॅट चिठ्ठ्या आणि ईव्हीएम मतांची जुळवणी करण्याबाबत यापूर्वी दिलेल्या निकालावर फेरविचार करावा, यासाठी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांच्यासोबत 21 विरोधी पक्षांनी ही याचिका दाखल केली होती.

विधानसभा क्षेत्रातील पाच मतदान केंद्रावरील व्हीव्हीपॅट आणि ईव्हीएम मतं यांची जुळवणी करावी असा आदेश न्यायालयाने दिला होता. सुरुवातीला एकाच मतदान केंद्रावरील व्हीव्हीपॅट चिठ्ठ्या आणि ईव्हीएम मतांची जुळवणी करण्याचे आदेश देण्यात आले. त्यानंतर न्यायालयाने याची सीमा पाच मतदान केंद्रांपर्यंत वाढवण्याचे आदेश दिले. मात्र, ही वाढ समाधानकारक नाही, यामुळे प्रश्न सुटणार नाही, असं विरोधकांचं मतं होतं. त्यामुळे न्यायालयाने या निर्णयावर फेरविचार करावा यासाठी विरोधकांनी न्यायालयात पुन्हा याचिका दाखल केली होती. ही याचिका आज न्यायालयाने फेटाळून लावली.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *