दिग्विजय सिंग यांच्या विजयाची भविष्यवाणी सांगणारा बाबा निकालानंतर गायब

भोपाळ : मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंग यांचा भोपाळ लोकसभा मतदारसंघातून दारुण पराभव झाला. भाजपच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूरने या भोपाळमध्ये निवडून आल्या. दिग्विजय सिंग यांच्या पराभवानंतर मिर्ची बाबा म्हणजेच महामंडलेश्वर स्वामी वैराग्यानंद हे सोशल मीडियावर ट्रेंड झाले आहेत. लोकसभा निवडणुकांचे निकाल आल्यानंतर लोक महामंडलेश्वर स्वामी वैराग्यानंद यांना शोधत आहेत. मात्र, या मिर्ची …

दिग्विजय सिंग यांच्या विजयाची भविष्यवाणी सांगणारा बाबा निकालानंतर गायब

भोपाळ : मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंग यांचा भोपाळ लोकसभा मतदारसंघातून दारुण पराभव झाला. भाजपच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूरने या भोपाळमध्ये निवडून आल्या. दिग्विजय सिंग यांच्या पराभवानंतर मिर्ची बाबा म्हणजेच महामंडलेश्वर स्वामी वैराग्यानंद हे सोशल मीडियावर ट्रेंड झाले आहेत. लोकसभा निवडणुकांचे निकाल आल्यानंतर लोक महामंडलेश्वर स्वामी वैराग्यानंद यांना शोधत आहेत. मात्र, या मिर्ची बाबाचा कुठेही थांगपत्ता नाही. मिर्ची बाबा अंडरग्राऊंड झाल्याचं सांगितलं जात आहे.

महामंडलेश्वर स्वामी वैराग्यानंद हे तेच मिर्ची बाबा आहेत ज्यांनी दिग्विजय सिंग यांच्या विजयासाठी लाल मिर्चीचं हवन केलं होतं.  या हवनमध्ये एकूण 5 क्विंटल लाल मिरच्यांचा वापर करण्यात आला होता. यावेळी महामंडलेश्वर स्वामी वैराग्यानंद यांनी अशी प्रतिज्ञा घेतली होती की, जर भोपाळमधून दिग्विजय सिंग हरले, तर ते त्याच हवन कुंडातच समाधी घेतील. त्यामुळे आता दिग्विजय सिंग यांच्या पराभवानंतर लोक या मिर्ची बाबाचा शोध घेत आहेत. पण, निवडणुकांचे निकाल दिग्विजय सिंग यांच्या विरोधात लागताच हे मिर्ची बाबा रफुचक्कर झाले आहेत. इतकंच नाही तर त्यांचा फोनही बंद आहे.

लोकसभा निवडणूक 2019 चे निकाल 23 मे रोजी म्हणजेच गुरुवारी लागले. यामध्ये पुन्हा एकदा भजपप्रणित एनडीए सरकारला पूर्ण बहुमत मिळालं. संपूर्ण देशभरात यावेळीही मोदी लाट होती, हे निवडणुकांच्या निकालावरुन स्पष्ट झालं. देशासोबतच मध्य प्रदेशातही भाजपने मुसंडी मारली. येथे 29 पैकी 28 जागा भाजपने जिंकल्या, तर काँग्रेसला केवळ एका जागेवर समाधान मानावं लागलं. मध्य प्रदेशात काँग्रेस केवळ छिंदवाडा मतदारसंघातून निवडून आली.

मध्य प्रदेशात मोदी लाटेसमोर दिग्गज नेतेही टिकू शकले नाहीत. गुना मतदारसंघातून ज्योतिरादित्य शिंदे यांना पहिल्यांदा पराभवाचा सामना करावा लागला. तर भोपाळ मतदारसंघातून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंग यांनाही पराभव स्वीकारावा लागला. याठिकाणी भाजपच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा निवडून आल्या.

लोकसभा निवडणूक 2019 मध्ये भोपाळ मतदारसंघातून काँग्रेसने पक्षाचे वरिष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंग यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं. त्यानंतर भाजपने दिग्विजय सिंग यांच्या विरोधात साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूरला उमेदवारी जाहीर केली. एकीकडे प्रज्ञा सिंह ठाकूर हिंदूत्वाच्या नावावर मतं मागत होत्या. दुसरीकडे शेकडो साधू दिग्विजय सिंहांना मत देण्याचं आव्हान जनतेला करत होते. मात्र, यासर्वांवर प्रज्ञा सिंह ठाकूर भारी पडल्या आणि भोपळमधून त्या जिंकून आल्या.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *