स्पीडमध्ये असलेला पाळणा तुटला; ट्रॉली 5 फूट लांब उडाली आणि…. जत्रेत घडली भयानक दुर्घटना; थरारक व्हिडिओ

या दुर्घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

स्पीडमध्ये असलेला पाळणा तुटला; ट्रॉली 5 फूट लांब उडाली आणि.... जत्रेत घडली भयानक दुर्घटना; थरारक व्हिडिओ
Follow us
| Updated on: Oct 01, 2022 | 5:43 PM

नवी दिल्ली : गाझियाबादमधील(Ghaziabad) रामलीला मैदानावर भरलेल्या जत्रेत एक भयानक दुर्घटना घडला आहे. जत्रेतील पाळणा (ब्रेक डान्स) तुटला(swing crash incident). या पाळण्याची ट्रॉली 5 फूट लांब उडाली आहे. या दुर्घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

पाळणा तुटल्याने तीन मुलांसह 4 जण जखमी झाले आहेत. पाळणा तुटल्यानंतर मैदानात एकच धावपळ उडाली. जखमींना तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

शुक्रवारी रात्री अकराच्या सुमारास हा अपघात घडला. जत्रेतील ब्रेक डान्स या पाळण्यात मुलं राईडचा आनंद घेत होती.

हा पाळणा स्पीडमध्ये होता. अचानक ब्रेक डान्स स्विंगची ट्रॉली तुटली आणि ती 5 फूट अंतरावर जाऊन उलटली. हा अपघात एवढा भीषण होता की पाळणा 90 अंशाच्या कोनात वर उंच गेला आणि नंतर 5 फूट अंतरावर जाऊन पडला.

याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. पाळणा तुटल्यानंतर काही लहान मुलं पाळण्यातून खाली पडल्याचे व्हिडिओत दिसत आहे. हा पाळणा उडून बाजूला असलेल्या रेलिंगवर आदळल्याचेही व्हिडिओत दिसत आहे.

या घटनेनेनंचर एकच गोंधळ उडाला. ब्रेक डान्स या पाळण्यात बसलेल्या आपल्या मुलांना बाहेर काढण्यासाठी पालकांनी एकच धावाधाव केली.

Non Stop LIVE Update
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.