कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचं सावट; ताजमहालसह सर्व स्मारके 15 मेपर्यंत बंद राहणार

त्याच पार्श्वभूमीवर केंद्रीय पुरातत्त्व खात्याच्या अंतर्गत येणारी स्मारकं, संग्रहालयं 15 मेपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. त्यामुळे ताजमहाल, लाल किल्ला पर्यटकांसाठी बंद राहणार आहे. Taj Mahal Closed For Tourists

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 0:13 AM, 16 Apr 2021
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचं सावट; ताजमहालसह सर्व स्मारके 15 मेपर्यंत बंद राहणार
Taj Mahal Closed For Tourists

नवी दिल्लीः गेल्या काही दिवसांपासून देशासह अनेक राज्यांत कोरोनाचं हाहाकार माजवला आहे. उत्तर प्रदेश आणि दिल्लीतही कोरोनाचा मोठ्या प्रमाणात फैलाव झालाय. त्याच पार्श्वभूमीवर केंद्रीय पुरातत्त्व खात्याच्या अंतर्गत येणारी स्मारकं, संग्रहालयं 15 मेपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. त्यामुळे ताजमहाल, लाल किल्ला पर्यटकांसाठी बंद राहणार आहे. (Taj Mahal Closed For Tourists Till 15th May Due To CoronaVirus)

ताजमहालसह सर्व स्मारके पुन्हा एकदा पर्यटकांसाठी बंद

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता ताजमहालसह सर्व स्मारके पुन्हा एकदा पर्यटकांसाठी बंद करण्यात आलीत. गुरुवारी संध्याकाळी पुरातत्त्व खात्याने हा आदेश काढला. त्याअंतर्गत ताजमहाल, आग्रा किल्ला, फतेहपूर सिक्रीसह देशभरातील सर्व स्मारके 15 मेपर्यंत बंद राहणार आहेत. 2020 मध्ये ताजमहाल कोरोनामुळे 188 दिवसांसाठी बंद होता.

ऐतिहासिक वास्तू, पुरातत्त्व स्थळे आणि संग्रहालयेही बंद

आग्र्यामधील ताजमहाल, आग्रा किल्ला, फतेहपूर सीकरी, एत्माद्दौला, सिकंदरा, महताब बाग यासह स्मारकांनाही टाळे ठोकण्यात आलेय. देशातील प्रमुख स्मारकांपैकी कुतुब मीनार, हुमायूंचा मकबरा, अजिंठा एलोराच्या लेण्यांसह 200हून अधिक ऐतिहासिक वास्तू, पुरातत्त्व स्थळे आणि संग्रहालयेही बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आलेत.

कोरोनामुळे ताजमहाल दुसऱ्यांदा बंद

कोरोना विषाणूमुळे ताजमहाल दुसऱ्यांदा बंद झालाय. 2020 मध्ये ताजमहालसह आग्र्यामधील सर्व स्मारके 17 मार्च ते 21 सप्टेंबरदरम्यान बंद ठेवण्यात आलीत. आग्रामध्ये पहिल्यांदाच ताजमहालसह सर्व संरक्षित स्मारके इतके दिवस बंद राहिले होते. कोरोनाची दुसरी लाट पाहून स्मारके पुन्हा एकदा बंद करण्याचा आदेश काढण्यात आलाय. अशा परिस्थितीत आग्राच्या पर्यटन उद्योगाशी संबंधित चार लाख लोकांनी पुन्हा रोजीरोटीची चिंता सतावते आहे.

बुधवारी 2706 पर्यटक ताजमहाल येथे पोहोचले

कोरोना संसर्ग वाढल्याने ताजमहालला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली होती. बुधवारी ताजमहाल पाहण्यासाठी किरकोळ पर्यटक आले होते. मंगळवारी ही संख्या 2816 होती. अवघ्या दोन आठवड्यांत ताजमहाल येथे पर्यटकांची संख्या 17 हजारांवरून 2706 वर गेलीय. बुधवारी दिवसभर ताजमहालवर पर्यटक कमी दिसले.

संबंधित बातम्या

हरिद्वारमधील कुंभमेळ्याच्या समाप्तीची घोषणा; निरंजनी आखाड्याकडून जाहीर

कुंभमेळ्यात कोरोनाचा विस्फोट, पाच दिवसांत 1701 जण कोरोना पॉझिटिव्ह

Taj Mahal Closed For Tourists Till 15th May Due To CoronaVirus