तमिळनाडूमध्ये चक्क सोने-चांदीचं ईव्हीएम मशीन

तामिळनाडू: सध्या देशात लोकसभा निवडणुकांचे वातावरण आहे. येत्या 11 एप्रिलपासून महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात मतदानाला सुरुवात होणार आहे. देशाचे नेतृत्व करणाऱ्या तरुण पिढीने निवडणूक प्रक्रियेत सहभागी होत मतदान करावं, असे आवाहन विविध क्षेत्रातील दिग्गज करत आहेत. या पार्श्वभूमीवर तामिळनाडूतील एका व्यक्तीने चक्क सोने-चांदीचा वापर करत ईव्हीएम मशीनची प्रतिकृती साकारली आहे. तमिळनाडूच्या कोयंबद्दूरमध्ये राहणाऱ्या राजा नावाच्या व्यक्तीने …

तमिळनाडूमध्ये चक्क सोने-चांदीचं ईव्हीएम मशीन

तामिळनाडू: सध्या देशात लोकसभा निवडणुकांचे वातावरण आहे. येत्या 11 एप्रिलपासून महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात मतदानाला सुरुवात होणार आहे. देशाचे नेतृत्व करणाऱ्या तरुण पिढीने निवडणूक प्रक्रियेत सहभागी होत मतदान करावं, असे आवाहन विविध क्षेत्रातील दिग्गज करत आहेत. या पार्श्वभूमीवर तामिळनाडूतील एका व्यक्तीने चक्क सोने-चांदीचा वापर करत ईव्हीएम मशीनची प्रतिकृती साकारली आहे.

तमिळनाडूच्या कोयंबद्दूरमध्ये राहणाऱ्या राजा नावाच्या व्यक्तीने हे अनोखं ईव्हीएम मशीन तयार केलं आहे. हे मशीन तयार करण्यासाठी राजाने 1 ग्रॅम चांदी आणि 300 मिलीग्रॅम सोने वापरले आहे. या ईव्हीएम मशीनमध्ये त्याने 18 पक्षांच्या निवडणूक चिन्हांची प्रतिकृती बनवली आहे. त्याशिवाय त्यांने कर्कटक आणि पेन्सिलचा वापर करत एक अनोख चित्र साकारलं आहे. यात त्याने पेन्सिलच्या सहाय्याने एक माणूस तयार केला आहे. याचा एक हात वर दाखवून ‘तरुणांना मतदान करा’ असं आवाहन करणार चित्र त्याने साकारलं आहे.

याआधीही कोयंबद्दूर शहरातील एका कलाकाराने महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, अब्दुल कलाम यांसारख्या महान नेत्यांच्या आकृत्या मेणबत्तीवर साकारल्या होत्या. त्याच्याप्रमाणे या व्यक्तीने अशाप्रकारे सोने-चांदीची प्रतिकृती साकारत हा रेकॉर्ड कायम ठेवला आहे. राजा हा एक सामाजिक कार्यकर्ता आहे. त्याने याआधी जल्लीकट्टूच्या मुद्द्यावर एका बैलाचे चित्र रेखाटले होते.

केंद्रीय निवडणूक आयोगाने 10 मार्चला लोकसभा निवडणूक 2019 च्या तारखा जाहीर केल्या. यानुसार लोकसभेच्या 543 जागांसाठी 7 टप्प्यात मतदान पार पडणार आहे. महाराष्ट्रात येत्या 11 एप्रिलपासून मतदानाला सुरुवात होणार आहे. त्यानंतर 18, 23, 29 एप्रिल, तर 6, 12 आणि 19 मे रोजी अशा सात टप्प्यात मतदान पार पडणार आहे. देशभरातील सर्व लोकसभा मतदारसंघाचा निवडणुकीचा निकाल 23 मे रोजी जाहीर होणार आहे.

पाहा व्हिडीओ:

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *