तामिळनाडू सरकार टिक-टॉक अॅप बॅन करणार?

चेन्नई : टिक-टॉक या व्हिडीओ अॅपमुळे होणाऱ्या अपघातांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे.  20 वर्षांखालील मुले या अॅपच्या आहारी जात आहेत. याचा विपरित परिणाम मुलांच्या मनावर होत आहे. यासाठी तामिळनाडू सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यात टिक-टॉक अॅपवर बंदी घालण्यासंबंधी तामिळनाडू सरकार केंद्र सरकारकडे मागणी करणार आहे. याबाबत तामिळनाडूचे माहिती आणि प्रसारण मंत्री एम. …

तामिळनाडू सरकार टिक-टॉक अॅप बॅन करणार?

चेन्नई : टिक-टॉक या व्हिडीओ अॅपमुळे होणाऱ्या अपघातांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे.  20 वर्षांखालील मुले या अॅपच्या आहारी जात आहेत. याचा विपरित परिणाम मुलांच्या मनावर होत आहे. यासाठी तामिळनाडू सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यात टिक-टॉक अॅपवर बंदी घालण्यासंबंधी तामिळनाडू सरकार केंद्र सरकारकडे मागणी करणार आहे. याबाबत तामिळनाडूचे माहिती आणि प्रसारण मंत्री एम. मणीकंदन यांनी सांगितले की, “तामिळनाडू सरकार टिक-टॉक अॅप बॅन करण्याच्या विचारात आहे. कारण यामुळे तामिळ संस्कृतीला कमी दाखवण्याचा प्रयत्न होत आहे. तसेच राज्यातील अनेक राजकीय पक्षांनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळे ब्लू व्हेल गेमप्रमाणे या अॅपवरही बंदी आणावी”.

या अॅपमुळे लहान मुलं आणि तरुण पिढीची दिशाभूल होत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने या अॅपवर बंदी घालायला हवी, असे मणीकंदन म्हणाले.

टिक-टॉक अॅपमुळे कायदा-सुव्यवस्थेसंबंधी समस्या उद्भवत आहेत. लोक या अॅपसाठी स्वत:चा जीवही धोक्यात घालायला तयार आहेत. अनेकांनी या अॅपमुळे आपला जीव गमावल्याची प्रकरणं समोर आली आहेत, असे अण्णा द्रमुक पक्षाचे नेते  मणीकंदन यांनी सांगितले.

याबाबत आमदार थमीमनु अन्सारी यांनीही आपले मत मांडले. “टिक-टॉकवर अनेकजण अश्लील व्हिडीओ अपलोड करतात. त्यामुळे तामिळनाडूत या अॅपला बॅन करायला हवे”, अशी मागणी अन्सारी यांनी केली.

टिक-टॉक अॅप काय आहे?

टिक-टॉक हे चीनी कंपनी ‘बाईट डान्स’चं एक व्हिडीओ अॅप आहे. या अॅपमध्ये 15 सेकंदापर्यंतचे व्हिडीओ बनवता येतात. 2016 मध्ये चीनमध्ये हे अॅप लाँच करण्यात आले होते. 2018 मध्ये या अॅपची लेकप्रियता वाढली, अमेरिकेत सर्वात जास्त डाऊनलोड करण्यात आलेल्या अॅपच्या यादीत हे पहिल्या क्रमांकावर आहे. भारतातही याची खूप लोकप्रियता आहे. विशेषकरुन तरुण आणि लहान मुलांना याचे जास्त वेड आहे. त्यामुळे अनेकजण यावर व्हिडीओ बनवून शेअर करत असतात.

महाराष्ट्रतही टिक-टॉक अॅपचं वेड बघायला मिळतं. तरुण आणि लहान मुलं या अॅपसाठी इतके वेडे झाले आहेत की अनेकांनी या अॅपपुढे आपल्या जिवाचीही पर्वा केली नाही. काही दिवसांपूर्वीच मुंबईत एका मुलीने आत्महत्या केली होती. तिच्या आत्महत्येचं कारण धक्कादायक होतं. टिक टॉकवर व्हिडीओ बनवत असल्यामुळे कुटुंबीय ओरडल्याने मुलीने आत्महत्या केली होती.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *