मोदींचा ‘मेड इन अमेठी’ रायफलवरुन राहुल गांधीवर निशाणा

अमेठी (उत्तर प्रदेश) : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा बालेकिल्ला असलेल्या अमेठीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑर्डिनन्स फॅक्टरीचं उद्घाटन केलं. यावेळी संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित होते. दहशतवादी आणि नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यासाठी अमेठीत जगातील अत्याधुनिक एके-203 रायफलची निर्मिती करण्यात येणार आहे, अशी घोषणा रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. …

मोदींचा ‘मेड इन अमेठी’ रायफलवरुन राहुल गांधीवर निशाणा

अमेठी (उत्तर प्रदेश) : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा बालेकिल्ला असलेल्या अमेठीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑर्डिनन्स फॅक्टरीचं उद्घाटन केलं. यावेळी संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित होते. दहशतवादी आणि नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यासाठी अमेठीत जगातील अत्याधुनिक एके-203 रायफलची निर्मिती करण्यात येणार आहे, अशी घोषणा रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. तसेच अमेठीत विविध विकासकामांचे उद्घाटन मोदींच्या हस्ते झाले.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा मतदारसंघ असलेल्या अमेठीत पहिल्यांदाच मोदींची जाहीर सभा झाली. यावेळी मोदींनी राहुल गांधीवर निशाणा साधला. काही लोक वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन मेड इन उज्जेन, मेड इन जैसलमेर, मेड इन बडोदा असे भाषण देत असतात. पण आम्ही ‘मेड इन अमेठी’ साकारत आहोत. येथे  एके-203 तयार होईल. यामुळे सेना आणखी मजबूत होईल. एके-203 ही अमेठीची नवी ओळख बनेल. भारत आणि रशियाच्या संयुक्त निर्मितीतून ही एके-203 रायफल तयार होणार आहे. यासाठी मोदींनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांचे आभार मानले.


गेल्या चार वर्षांपासून अमेठी आणि उत्तर प्रदेशात विकासाच्या दृष्टीने आमच्या सरकारने जेवढी कामं केली त्यांना आणखी मोठं करण्यासाठी त्यांचा विस्तार करण्यासाठी मोदी अमेठीत आल्याचं त्यांनी सांगितलं. देशाचे जवान आता लवकरच ‘मेड इन अमेठी’ रायफल वापरणार, असे म्हणत मोदींनी राहुल गांधींना टोलाही लगावला.


पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसवरही निशाणा साधला. पूर्वीच्या सरकारने सुरक्षा दलाच्या सुरक्षेबाबत अत्यंत हलगर्जीपणा बाळगला. देशाकडे अत्याधुनिक रायफल नाही, आधुनिक बुलेटप्रूफ जॅकेट नाही, आधुनिक तोफ नाही असे त्यांनी सांगितलं. मात्र, आमच्या सरकारने आधुनिक हॉविट्झर तोफेचा करार केला आणि आता तर हे सर्व भारतातच तयार होतं.

जनतेची मतं मिळाल्यानंतर काहीजण त्यांना विसरुन जातात. त्यांना गरीबी कायमच ठेवायची असते, जेणेकरुन ते पिढ्यान-पिढ्या गरीबी मिटवण्याचे आश्वासन देऊन जनतेची दिशाभूल करु शकतील. मात्र, गरिबीतून बाहेर येण्यासाठी आम्ही गरिबांना ताकद दिली. आम्ही अमेठीत निवडणूक हरलो असलो तरी, आम्ही इथल्या जनतेची मनं जिंकली आहेत, असेही मोदी म्हणाले.


गेल्या 5 वर्षांत स्मृती इराणींनी अमेठीच्या विकासासाठी खूप चांगलं काम केलं. त्यांनी कधीही तुम्हाला त्यांना जिंकून दिल्याबद्द्ल किंवा जिंकून न दिल्याबद्दल दुजाभाव केला नाही. इथून जे जिंकले त्यांच्यापेक्षा जास्त काम इराणींनी केल्याचं मोदी म्हणाले.

अमेठीमध्ये मोदींनी गौरीगंजच्या कौहारमध्ये जवळपास 538 कोटींच्या 17 योजनांचं लोकार्पण आणि भूमिपूजन केलं.

एके-203 रायफलमधील वैशिष्ट्ये

भारत अमेठीमध्ये रशियन कंपनीच्या मदतीने साडे सात लाख एके-203 रायफल तयार करणार आहे. ही रायफल भारतीय लष्करातील इंसास रायफलची जागा घेईल. ही एके सिरीजची नवी रायफल आहे. हे 2018 सालचं मॉडेल आहे. या रायफलची अॅक्यूरेसीही जास्त आहे, तसेच याची पकड अधिक चांगली आहे. पहिल्या टप्प्यात एके-203 या रायफल लष्कर, हवाई दल आणि नौदलाला देण्यात येईल. त्यानंतर पुढील टप्प्यात ती निमलष्करी आणि राज्य पोलीस दलालाही या रायफल्स देण्यात येतील.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *