नागालँडला जाण्यासाठी व्हिसा लागतो?;..आणि तिथली लोकं माणसं मारून खातात; भाजपचे मंत्री अलाँग यांचा व्हिडीओ व्हायरल

टेमजेन इमना अलाँग या व्हिडिओमध्ये बोलताना म्हणतात की, भारतात नागालँडबद्दल अनेक गैरसमज पसरले आहेत. त्याचे उदाहरण देताना ते सांगतात की, नागालँडचे लोक माणूस मारुन खातात. हा व्हिडीओ त्यांनी 13 जुलै रोजी ट्विटरवर शेअर केला होता.

नागालँडला जाण्यासाठी व्हिसा लागतो?;..आणि तिथली लोकं माणसं मारून खातात; भाजपचे मंत्री अलाँग यांचा व्हिडीओ व्हायरल
Follow us
| Updated on: Jul 13, 2022 | 7:00 PM

नवी दिल्ली: सध्या सोशल मीडियावर नागालँड सरकारमधील उच्च शिक्षण तथा आदिवासी व्यवहार मंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष मंत्री तेमजेन इमना अलाँग (Temjen Imna Along) यांचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ते एक आपली दिल्लीतील आठवण सांगत आहेत. ते म्हणता की, 1999 मध्ये दिल्लीला आल्यावर आपल्याला आपल्याविषयी लोकं काय विचार करतात ते समजले आहे. नागालँडमधील (Nagaland) विविध खाद्यपदार्थ, जुन्या दिल्ली स्टेशनवर येण्याचा अनुभव आणि त्यांच्या आयुष्यातील अनेक गोष्टींवर ते या व्हिडिओमध्ये सांगत आहेत.

टेमजेन इमना अलाँग या व्हिडिओमध्ये बोलताना म्हणतात की, भारतात नागालँडबद्दल अनेक गैरसमज पसरले आहेत. त्याचे उदाहरण देताना ते सांगतात की, नागालँडचे लोक माणूस मारुन खातात. हा व्हिडीओ त्यांनी 13 जुलै रोजी ट्विटरवर शेअर केला होता. त्यामध्ये ते सांगतात की, मी जेव्हा 1999 मध्ये पहिल्यांदा दिल्लीला आलो, त्यावेळी आम्ही जुन्या दिल्ली रेल्वे स्टेशनवर उतरलो होतो. तेव्हा आम्हाला आमच्या नागालँड राज्यापेक्षा जास्त लोकसंख्या इथे दिसली.’ त्यावेळी एवढी लोकं बघून आम्ही आश्चर्यचकीत झालो होतो. आणि त्यावेळी लोकं विचारायची की नागालँड कुठे आहे? तिथे जाण्यासाठी व्हिसाची गरज आहे का? नागा लोक माणसाला खातात का? असे सांगत ते सांगतात की नागालँडबद्दल लोकांमध्ये चुकीची माहिती पसरवली गेली आहे.

आम्ही दिसायला वेगळे

ते असंही सांगतात की, आम्ही दिसायला वेगळे आहोत, आमचे खाण्याचे पदार्थ वेगळे आहेत, विचार करण्याची पद्धत वेगळी आहे. 50 वर्षांपासून त्याच पद्धतीने राहत आलो आहोत.’ त्यांचा हा व्हिडिओ आतापर्यंत हजारो लोकांनी रिट्विट केला आहे. तसेच, अनेकांना त्यांचा हा व्हिडिओ आणि त्यांनी जे प्रामाणिकपणे सांगितले आहे ते अनेक जणांना आवडतही आहे.

लोकं परदेशी समजतात

ट्विटरवर आपल्या अनुभवाचे आणि आठवणींच्या गोष्टी सांगताना टेमजेन यांचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यामध्ये त्यांनी त्यांच्या आग्रा येथे आल्यानंतरचा एक अनुभव सांगितला होता शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये त्यांनी सांगितले आहे की, 1999 मध्ये आग्रा येथे ताजमहाल पाहण्यासाठी ते काउंटरवर पोहोचले तेव्हा लोकांनी त्यांना परदेशी समजत होते आणि तिकीटाचेही 20 डॉलर्स मागिण्यात आले. त्यावेळी त्यांना सांगावे लागले की, मी भारतीयच आहे, आणि नागालँडचे रहिवासी आहेत.

डोळ्यांचे असेही फायदे

टेमगेन यांच्या दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये त्यांनी लहान डोळ्यांचे फायदे सांगितले. ‘डोळे लहान असल्यामुळे डोळ्यात घाण कमी जाते. स्टेजवर कार्यक्रम सुरू असताना झोपही घेता येते,’ असे म्हणताच कार्यक्रमातील अनेकजण हसू लागतात. हे त्यांनी त्यांचे सांगितलेले किस्से सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दलही लोकांनी त्यांना रिट्विट केले आहे.

Non Stop LIVE Update
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.