जॉन्सन अॅण्ड जॉन्सन कंपनीच्या उत्पादनावर बंदी !

नवी दिल्ली : राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाने (एनसीपीसीआर) बहुराष्ट्रीय कंपनी जॉन्सन अॅण्ड जॉन्सनच्या सर्व वस्तूंवर बंदी घातली आहे. बेबी शॅम्पू आणि टालकम पावडरमध्ये कॅन्सरला जबाबदार घटक असल्यामुळे सर्व राज्यातील विक्रीवर बंदी घालण्यात आली. तसेच संबंधित उत्पादने बाजारातून हटवण्याचे आदेश देण्यात आले. अमेरिकेतही या कंपनीच्या सर्व उत्पादनांवर बंदी घालण्यात आली. भारतात पहिल्यांदाच जॉन्सन कंपनीच्या उत्पादनावर …

जॉन्सन अॅण्ड जॉन्सन कंपनीच्या उत्पादनावर बंदी !

नवी दिल्ली : राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाने (एनसीपीसीआर) बहुराष्ट्रीय कंपनी जॉन्सन अॅण्ड जॉन्सनच्या सर्व वस्तूंवर बंदी घातली आहे. बेबी शॅम्पू आणि टालकम पावडरमध्ये कॅन्सरला जबाबदार घटक असल्यामुळे सर्व राज्यातील विक्रीवर बंदी घालण्यात आली. तसेच संबंधित उत्पादने बाजारातून हटवण्याचे आदेश देण्यात आले. अमेरिकेतही या कंपनीच्या सर्व उत्पादनांवर बंदी घालण्यात आली. भारतात पहिल्यांदाच जॉन्सन कंपनीच्या उत्पादनावर बंदी घातली आहे.

सर्व राज्यातील मुख्य सचिवांना आदेश

बेबी टालकम पावडर आणि शाम्पूमध्ये एस्बेस्टॉस हा घटक सापडल्यामुळे सर्व राज्य आणि केंद्रशासित राज्यातील मुख्य सचिवांना आदेश देण्यात आले. आदेशाच्या पत्रामध्ये अधिकाऱ्यांना आपल्या-आपल्या विभागातील या कंपनीच्या उत्पादनावर बंदी घालण्यास सांगण्यात आले आहे. आयोगाने बाजारात उपलब्ध असलेले जॉन्सन अॅण्ड जॉन्सन बेबी टालकम पावडर आणि शाम्पू हटवण्याचे आदेश दिले आहेत.

राजस्थानमध्ये कॅन्सरचे तत्व मिळाल्यामुळे कारवाई

राजस्थानमधील एका बाजारात जॉन्सन अॅण्ड जॉन्सन बेबी शाम्पू तसेच टालकम पावडरमध्ये एस्बेस्टॉस आणि कॅन्सरला जबाबदार घटक सापडले. आयोगाने आंध्रप्रदेश, राजस्थान, झारखंड, मध्यप्रदेश आणि आसामच्या मुख्य सचिवांना जॉन्सन अॅण्ड जॉन्सनच्या उत्पादनाचे नमुने घेऊन अहवाल पाठवण्याचे आदेश दिले आहेत.

जॉन्सन कंपनीला परदेशात कोटी रुपयांचा दंड

यापूर्वीही जॉन्सन अॅण्ड जॉन्सनच्या अनेक प्रॉडक्ट्स लहान मुलांच्या आरोग्यासाठी हानिकारक असल्याचे समोर आले होते. परदेशात याविरोधात मोठी कारवाई झाली होती. तसेच कंपनीला कोट्यावधी रुपयांचा दंड भरावा लागला होता. राऊटर्सच्या इन्वेस्टीगेशनमुळे याचा खुलासा झाला आहे. त्यानंतर 9 हजारपेक्षा अधिक लोकांनी या कंपनीविरोधात केस केल्या होत्या.

कंपनीच्या उत्पादनामध्ये एस्बेस्टॉस आहे. यामुळे कॅन्सर होण्याची शक्यता वाढते, असा आरोप अनेकांनी केला आहे. कोर्टानेही पीडित परिवारांना नुकसान भरपाई देण्यासाठी जॉन्सन कंपनीला अंदाजे 4.7 अब्ज डॉलर देण्यास भाग पाडले.

काय आहे एस्बेस्टॉस?

एस्बेस्टॉस एक धोकादायक असा पदार्थ आहे. आरोग्यासाठी हा हानिकारक आहे. आपल्या शरीरात हा पदार्थ गेला, तर अनेक प्रकारचे आजार होऊ शकतात. यामुळे कॅन्सर होण्याचाही धोका वाढतो. बेबी पावडरचा वापर केल्याने लहान मुलांसह त्याच्या आईलाही याचा धोका आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *