गुजरातचे माजी मुख्यमंत्री आज राष्ट्रवादीत प्रवेश करणार

गांधीनगर : गुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकरसिंह वाघेला हे आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. वाघेला यांच्या राष्ट्रवादी प्रवेशावर राष्ट्रवादीकडूनही दुजोरा देण्यात आला आहे. वाघेला हे गुजरात राज्यातील राजकारणातील अत्यंत मोठे नेते आहेत. त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर राष्ट्रवादीची गुजरातमधील ताकद वाढेल, हे निश्चित. वाघेला यांनी भाजपमधून आपली राजकीय कारकीर्द सुरु केली, त्यानंतर 1996 मध्ये भाजप सोडून …

गुजरातचे माजी मुख्यमंत्री आज राष्ट्रवादीत प्रवेश करणार

गांधीनगर : गुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकरसिंह वाघेला हे आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. वाघेला यांच्या राष्ट्रवादी प्रवेशावर राष्ट्रवादीकडूनही दुजोरा देण्यात आला आहे. वाघेला हे गुजरात राज्यातील राजकारणातील अत्यंत मोठे नेते आहेत. त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर राष्ट्रवादीची गुजरातमधील ताकद वाढेल, हे निश्चित. वाघेला यांनी भाजपमधून आपली राजकीय कारकीर्द सुरु केली, त्यानंतर 1996 मध्ये भाजप सोडून काँग्रेस मध्ये गेले, तिथे त्यांना मुख्यमंत्रिपद मिळाले. त्यानंतर 2017 मध्ये गुजरात विधानसभा निवडणुकीआधी वाघेला यांनी काँग्रेसला राम राम ठोकला होता. आता त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि पक्षाचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत गुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकरसिंह वाघेला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, अशी माहिती राष्ट्रवादीचे गुजरातचे प्रदेशाध्यक्ष जयंत पटेल यांनी सांगितले. तसेच, गुजरातमधील जनतेची नस माहित असणारे आणि ताकदवान नेते म्हणून ओळखले जाणारे शंकरसिंह वाघेला राष्ट्रवादीत येत असल्याने पक्षाला नक्कीच फायदा होईल, असेही पटेल म्हणाले.

कोण आहेत शंकरसिंह वाघेला?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक, नंतर जनसंघात प्रवेश, पुढे जनसंघाचं भारतीय जनता पक्षात रुपांतर झाल्यानंतर, पक्षाचं काम, असा सुरुवातीचा प्रवास शंकरसिंह वाघेला यांचा आहे. 1996 साली भाजपला राम राम ठोकत, त्यांनी राष्ट्रीय जनता पार्टी स्थापन केली. पुढे हा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला आणि त्यावेळी त्यांना काँग्रेसकडून मुख्यमंत्रिपदही मिळालं. 1996 ते 1997 या काळात वाघेला गुजरातचे मुख्यमंत्री होते.

दोन वर्षापूर्वी गुजरात विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर 21 जुलै 2017 रोजी शंकरसिंह वाघेला यांनी काँग्रेसलाही राम राम ठोकला. आपल्याला मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार घोषित केलं नाही, ही त्यांची काँग्रेस सोडताना नाराजी होती. काँग्रेस सोडल्यानंतर जन विकल्प मोर्चा नावाचा पक्ष सुरु केला. गुजरातच्या विधानसभा निवडणुकाही लढवल्या. मात्र, एकही जागा जिंकता आली नाही. आता त्यांनी राष्ट्रवादीसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे.

पाचवेळा लोकसभा खासदार, एकवेळा राज्यसभा खासदार, आमदार, मनमोहन सिंग यांच्या पहिल्या सरकारमध्ये वस्त्रोद्योग मंत्रिपद अशी अनेक महत्त्वाची पदं त्यांनी भूषवली आहेत.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *