5 वी ते 10 वी, दप्तराचं वजन किती असावं? यादी तयार

नवी दिल्ली : शालेय विद्यार्थ्यांच्या दप्तराचं ओझं कायमच चर्चेचा विषय असतो. मोठ-मोठ्या वजनाचे दप्तर घेऊन शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना आता दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मानव विकास संसाधन मंत्रालयाने आता शालेय विद्यार्थ्यांच्या दप्तराचं ओझं कमी करण्यासाठी पावलं उचलली आहेत. पहिली ते दहावीपर्यंतच्या शालेय विद्यार्थ्यांच्या दप्तराचं वजन किती असावं, हे ठरवून दिलं आहे. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्नही …

5 वी ते 10 वी, दप्तराचं वजन किती असावं? यादी तयार

नवी दिल्ली : शालेय विद्यार्थ्यांच्या दप्तराचं ओझं कायमच चर्चेचा विषय असतो. मोठ-मोठ्या वजनाचे दप्तर घेऊन शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना आता दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मानव विकास संसाधन मंत्रालयाने आता शालेय विद्यार्थ्यांच्या दप्तराचं ओझं कमी करण्यासाठी पावलं उचलली आहेत. पहिली ते दहावीपर्यंतच्या शालेय विद्यार्थ्यांच्या दप्तराचं वजन किती असावं, हे ठरवून दिलं आहे. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्नही सुटेल.

वजनदार दप्तरामुळे शालेय विद्यार्थ्यांच्या कंबरेवर परिणाम होतो. हेच लक्षात घेऊन मानव विकास संसाधन मंत्रालयाने आता पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी नवी मार्गदर्शक तत्त्व जाहीर केली असून, त्यांची अंमलबजावणी सुरु करण्यास सांगितले आहेत.

देशातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना उद्देशून मानव विकास संसाधन मंत्रालयाने आदेशच जारी केला आहे. या आदेशानुसार, पहिली ते दहावीपर्यंतच्या शालेय विद्यार्थ्यांच्या दप्तराचं वजन ठराविक असायला हवं. ते किती असावं, याची यादीच मानव संसाधन विकास मंत्रालयाने जाहीर केली आहे.

मानव संसाधन विकास मंत्रालयानुसार :

  • इयत्ता पहिली ते दुसरी : बॅगचं वजन – 1.5 किलोपर्यंत
  • इयत्ता तिसरी ते पाचवी : बॅगचं वजन – 2 किलो ते 3 किलोपर्यंत
  • इयत्ता सहावी ते सातवी : बॅगचं वजन – 4 किलोपर्यंत
  • इयत्ता आठवी ते नववी : बॅगचं वजन – 4.5 किलोपर्यंत
  • इयत्ता दहावी : बॅगचं वजन – 5 किलोपर्यंत

याचसोबत, मानव संसाधन विकास मंत्रालयाने गृहपाठासंदर्भातही काही नियम घोषित केले हेत. पहिली आणि दुसरी इयत्तेतील विद्यार्थ्यांना गृहपाठ देण्यात येऊ नयेत, असे आदेश देण्यात आले आहेत. तसेच, पहिली आणि दुसरी इयत्तेतील विद्यार्थ्यांना गणित आणि भाषा हेच दोन विषय शिकवावेत. त्यानंतर तिसरी ते पाचवी इयत्तेतील विद्यार्थ्यांना भाषा, ईव्हीएस आणि गणिताचं एनसीआरटीचा अभ्यासक्रम शिकवावा.

तसेच, कुठल्याही विद्यार्थ्याने शाळेत एक्स्ट्रा पुस्तके, वह्या आणू नयेत, जेणेकरुन बॅगचे वजन आणखी वाढेल, असेही मानव संसाधन विकास मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *