'चौकीदार चोर आहे' आणि आम्ही हे सिद्ध करु : राहुल गांधी

नवी दिल्ली : संपूर्ण देशाला माहित आहे की, चौकीदार चोर आहे आणि आम्ही हे सिद्ध करुन दाखवू. पंतप्रधान मोदी हे अनिल अंबनींचे मित्र आहेत आणि त्यांनी अनिल अंबानीसाठी चोरी केलीय, असा घणाघाती आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला. राफेल करारावर सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन पुन्हा पंतप्रधान …

, ‘चौकीदार चोर आहे’ आणि आम्ही हे सिद्ध करु : राहुल गांधी

नवी दिल्ली : संपूर्ण देशाला माहित आहे की, चौकीदार चोर आहे आणि आम्ही हे सिद्ध करुन दाखवू. पंतप्रधान मोदी हे अनिल अंबनींचे मित्र आहेत आणि त्यांनी अनिल अंबानीसाठी चोरी केलीय, असा घणाघाती आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला. राफेल करारावर सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. तसेच, अनेक महत्त्वाचे प्रश्नही उपस्थित केले. “526 कोटी किंमतीचे राफेल विमान 1600 कोटींना का खरेदी केले? संरक्षण मंत्री सातत्याने आपलं वक्तव्य बदलत का आहेत? अनिल अंबनींच्या कंपनीला कंत्राट का दिले? पंतप्रधान नरेंद्र मोदी या सर्व प्रश्नांवर का बोलत नाहीत?” अशा प्रश्नांची सरबत्ती राहुल गांधी यांनी आजच्या पत्रकार परिषदेतून पंतप्रधान मोदींवर केली.

एचएएल कंपनीकडून कंत्राट काढून घेतला गेल्याचा आरोप राहुल गांधींनी केला. तसेच, “कॅगचा राफेलबाबतचा अहवाल पीएसीमध्ये (पब्लिक अकाऊंट कमिटी) का ठेवला गेला नाही? कॅगला पूर्ण माहिती का दिली नाही? जेपीसीची मागणी का मान्य करत नाहीत? पीएसीला राफेलच्या किंमती का सांगितल्या जात नाहीत?”, असे प्रश्नही राहुल गांधींनी उपस्थित केले.

ज्या दिवशी राफेल कराराची चौकशी होईल, तेव्हा दोन नावं समोर येतील, एक म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दुसरं म्हणजे अनिल अंबनी, असेही राहुल गांधी म्हणाले.

“नरेंद्र मोदी यांची पीएसी वेगळी आहे का? कारण मल्लिकार्जुन खर्गे हे पीएसीचे सदस्य आहेत आणि त्यांना कोणताच अहवाल दिलेला नाही.”, असे राहुल यांनी सांगितले.

राफेलबाबत आज कोर्टाने म्हटलं आहे की, “आम्हाला सरकारने राफेल विमानांची मूळ किंमत आणि आधुनिक उपकरणांसाठी लागलेली किंमत याची माहिती दिली आहे. सरकारने ही माहिती कॅग आणि पीएसीलाही दिली. आम्ही सीलबंद लिफाफ्यातील ही माहिती पाहिली आहे. त्यामुळे आम्ही आश्वस्त आहोत की, विमानांच्या या खरेदीमध्ये देशाला व्यावसायिक लाभही झाला आहे. विमानांच्या किंमतीची तुलना करणे हे कोर्टाचे काम नाही.”

मात्र, पीएसीचे सदस्य असलेले मल्लिकार्जुन खर्गे यांनी म्हटेल आहे की, “कॅगकडे असा कोणताच अहवाल आलेला नाही. मग हा अहवाल आला कुठून? कोर्टाने म्हटलंय की, विमानांच्या किंमतीचा अहवाल कॅगला आणि पीएसीला दिला आहे. मात्र कॅग आणि पीएसीला दिलेलाच नाही. मी पीएसीचा अध्यक्ष आहे, माझ्याकडे तरी असा अहवाल आला नाही. त्यामुळे पीएसीबाबत कोर्टात सरकारने खोटी माहिती दिली.”

VIDEO : राहुल गांधी यांची पत्रकार परिषद :

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *