गुजरातच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या घरी चोरी, चौकीदारच चोर असल्याचा संशय

अहमदाबाद: गुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकरसिंह वाघेला यांच्या घरी चोरी झाली आहे. चोरट्याने जवळपास 5 लाख रुपयांची रोकड आणि साहित्यावर हात साफ केला. याबाबत गांधीनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. 3 लाख रुपयांची रोकड आणि 2 लाखांचे दागिने चोरीला गेल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. महत्त्वाचं म्हणजे वाघेलांचा चौकीदारच चोर असल्याचा संशय आहे. पोलीस सध्या चौकशी …

, गुजरातच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या घरी चोरी, चौकीदारच चोर असल्याचा संशय

अहमदाबाद: गुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकरसिंह वाघेला यांच्या घरी चोरी झाली आहे. चोरट्याने जवळपास 5 लाख रुपयांची रोकड आणि साहित्यावर हात साफ केला. याबाबत गांधीनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. 3 लाख रुपयांची रोकड आणि 2 लाखांचे दागिने चोरीला गेल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. महत्त्वाचं म्हणजे वाघेलांचा चौकीदारच चोर असल्याचा संशय आहे. पोलीस सध्या चौकशी करत आहेत. वाघेलांच्या गांधीनगर परिसरातील घरी ही चोरी झाली.

वाघेलांचे निकटवर्तीय सूर्यसिंह चावडा यांनी याबाबत तक्रार दिली आहे. या तक्रारीत चौकीदारावर संशय व्यक्त करण्यात आला आहे. 4 वर्षापूर्वी बासुदेव नेपाली नावाचा चौकीदार होता. तो आपल्या पत्नी आणि मुलांसह इथे राहात होता. त्यानंतर तो ऑक्टोबर महिन्यात पत्नी-मुलांना घेऊन गेला तो परतलाच नाही.

चौकशी सुरु
पोलिसात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार, ज्या खोलीच्या तिजोरीत हे पैसे आणि दागिने ठेवले होते, ती खोली वासूदेवच वापरत होता. त्यामुळे या चोरीमागे त्याचा हात असू शकतो. लग्नसोहळ्या निमित्त वाघेला परिवारातील महिला हे दागिने शोधण्यासाठी गेल्या, त्यावेळी चोरी झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं. याप्रकरणी पेथापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास सुरु आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *