समद्र किनाऱ्यावर होतं कपल, वाटलं लाटेत पत्नी बुडाली, हेलिकॉप्टरने शोधूनही सापडेना.. मग आला व्हॉईस मेसेज, म्हणाली..

पत्नी साई प्रिया समुद्राकडे पाय धुण्यासाठी म्हणून गेली होती. मात्र ती परत आलीच नाही. श्रीनिवास यांच्या तक्रारीनंतर पोलीस आणि शहर प्रशासनाने नैदलाच्या हेलिकॉप्टरने आणि विशेष पोहणाऱ्यांकडून तिचा तपास केला. मात्र दोन दिवसांच्या तपासानंतर त्यांच्या पदरी निराशाच पडली. नंतर मात्र जे घडले ते अविश्वसनीय असेच म्हणावे लागेल. 

समद्र किनाऱ्यावर होतं कपल, वाटलं लाटेत पत्नी बुडाली, हेलिकॉप्टरने शोधूनही सापडेना.. मग आला व्हॉईस मेसेज, म्हणाली..
प्रेम प्रकरणाचा फटका पोलिसांनाImage Credit source: social media
Follow us
| Updated on: Jul 28, 2022 | 7:22 PM

विशाखापट्टणम- आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम (Vishakhapatnam)समुद्र किनाऱ्यावर  (beach)एक विवाहित महिला बेपत्ता झाली होती. मा्त्र ती सुरक्षित असल्याचे एखाद्या फिल्मी ट्विस्टप्रमाणे (filmy twist)समोर आले आहे. बंगळुरुत ती तिच्या प्रियकरासोबत सुखरुप आणि सुरक्षित आहे. साई प्रिया आपल्या लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी, पती श्रीनिवास यांच्यासोबत सोमवारी आर के बीचवर फिरण्यासाठी पोहचली होती. त्यानंतर ती अचानक बेपत्ता झाली. पती श्रीनिवास यांना वाटले की समद्रातील लाटांमध्ये ती वाहून गेली आणि बुडाली. त्यांनी आपली पत्नी बुडाल्याची तक्राही नोंदवली. त्यांनी सांगितले होते की, ते दोघेही समुद्र किनाऱ्यावर असताना थोडा वेळ वेगवेगळे झाले होते. त्यावेळी पत्नी साई प्रिया समुद्राकडे पाय धुण्यासाठी म्हणून गेली होती. मात्र ती परत आलीच नाही. श्रीनिवास यांच्या तक्रारीनंतर पोलीस आणि शहर प्रशासनाने नैदलाच्या हेलिकॉप्टरने आणि विशेष पोहणाऱ्यांकडून तिचा तपास केला. मात्र दोन दिवसांच्या तपासानंतर त्यांच्या पदरी निराशाच पडली. नंतर मात्र जे घडले ते अविश्वसनीय असेच म्हणावे लागेल.

प्रशासनाची माफी मागते, महिलेने सांगितले

शहरातील पोलीस स्टेशनचे इन्सपेक्टर रामाराव यांनी सांगितले की, बुधवारी साई प्रिया यांच्या नातेवाईकांना व्हायट्स्पवर साई प्रियाचा व्हॉईस मेसेज आला. त्यात तिने सांगितले की, मी साई प्रिया बोलत आहे. मी जिवंत आहे आणि प्रियकर रवी याच्यासोबत सुरक्षित आहे. आम्ही दोघेही बऱ्याच काळापासून एकमेकांच्या प्रेमात होतो. आता आम्ही लग्न केले आहे. मला शोधण्याचा प्रयत्न करु नका. मी पळून पळून थकले आहे. जर जास्त दबाव टाकाल तर जीवाचं काहीतरी बरंवाईट करुन घेईन. घडलेल्या प्रकाराबाबत मी पोलीस आणि प्रशासनाची क्षमा मागते. रवीच्या कुटुंबीयांना त्रास देण्याचा प्रयत्न करु नका.या सगळ्यात त्यांचा कहीही दोष नाहीये.

हे सुद्धा वाचा

मोबाईल डेटावरुन बंगळुरुत असल्याची माहिती

साई प्रिया हिच्या मोबाईल कॉल डेटाच्या माहितीवरुन ती आपल्या प्रियकरासोबत बंगळुरुत असल्याची पोलिसांची माहिती आहे. श्रीनिवास आणि साई प्रिया यांच्या लग्नाला दोन वर्षे झाली होती. कॉम्प्युटर कोटिंग क्लासच्या नावाखाली प्रिया विशाखापट्टणम येथे राहत असे. हे दोघेही एकमेकांसोबत आनंदी नव्हते. मात्र या सगळ्यात साईप्रियाच्या सर्च ऑपरेशनसाठी प्रशाससाने सुमारे एक कोटींचा खर्च केल्याची माहिती आहे. या प्रकाराने प्रशासन आणि पोलिसांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. साई प्रिया आणि रवीच्या प्रेमप्रकरणाचा फटका नाहक विशाखापट्टणमच्या पोलीसांना आणि प्रशासनाला बसला अशी चर्चा सध्या सुरु आहे.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.