दंड दिसतो, दीड लाख लोकांचे जीव गेलेले दिसत नाहीत का : नितीन गडकरी

महसूल उत्पन्नासाठी (Revenue Income)  दंडात वाढ केली नसून लोकांचे जीव वाचवण्यासाठी वाढ केली आहे, असं मत केंद्रीय रस्ते, वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी पत्रकारांशी संवाद साधताना व्यक्त केलं.

दंड दिसतो, दीड लाख लोकांचे जीव गेलेले दिसत नाहीत का : नितीन गडकरी

नवी दिल्ली : महसूल उत्पन्नासाठी (Revenue Income)  दंडात वाढ केली नसून लोकांचे जीव वाचवण्यासाठी वाढ केली आहे, असं मत केंद्रीय रस्ते, वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी पत्रकारांशी संवाद साधताना व्यक्त केलं.

देशात नवीन मोटार वाहन कायदा (New Motor Vehicle Rules) लागू झाल्यापासून वाहतुकीच्या नियमांमध्ये बदल झाले आहेत. या नव्या नियमांना नागिरकांमधून विरोध होत आहेत. त्यासोबतच काही राज्यांनी हा वाहतूक नियम लागू करण्यासाठी विरोध दर्शवला आहे. तर गुजरातमधील राज्य सरकारने मोटार वाहन कायद्यात बदल करून दंडाच्या रकमेत घट केली आहे.

“ही महसूल जमा करण्याची योजना नाही. आतापर्यंत दीड लाख लोकांचा मृत्यू अपघातामुळे झाला आहे. याची काळजी कुणाला नाही का? जर राज्य सरकार यामध्ये बदल करत असेल, तर लोक कायद्याला घाबरत नाहीत किंवा त्याचे पालन करत नाहीत, असं बोलणं चुकीचं ठरेल”, असं केंद्रीयमंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) म्हणाले.

वाहन कायद्यात बदल केल्यामुळे वाहतूक पोलीस नियम मोडणाऱ्यावर कडक कारवाई करत आहेत. त्यामुळे देशातील नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. नवीन मोटार वाहन कायदा 1 स्पटेंबरपासून लागू करण्यात आला आहे. तेव्हापासून आतापर्यंत देशातील अनेक भागात वाहतूक पोलिसांनी मोठ्या प्रमाणात नियम मोडणाऱ्यांवर कारवाया केल्या आहेत.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *