विमानांना बॉम्बने उडविण्याच्या धमक्या थांबेनात, आठवड्यात 70 विमानांना फटका, 200 कोटींचे नुकसान

एक आठवड्यात 90 हून अधिक विमानांना धमकीचे कॉल आले आहेत. गृहमंत्रालयाने या संदर्भात सिव्हील एव्हीएशन मिनिस्ट्री आणि ब्युरो ऑफ सिव्हील एव्हीएशन सिक्युरीटीकडून सविस्तर अहवाल मागवला आहे. सीआयएसएफ, एनआयए आणि आयबीला देखील रिपोर्ट देण्यास सांगितले आहे.

विमानांना बॉम्बने उडविण्याच्या धमक्या थांबेनात, आठवड्यात 70 विमानांना फटका, 200 कोटींचे नुकसान
Follow us
| Updated on: Oct 20, 2024 | 8:41 PM

विमानांत बॉम्ब ठेवण्याच्या निनावी धमक्या काही थांबायचे नावच घेत नाहीएत अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसात हे प्रमाण वाढतच चालले आहे. रविवारी 20 ऑक्टोबर रोजी तर विविध एअर लाईन्सच्या 14 विमानांना बॉम्बने उडविण्याच्या धमक्या आल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. इंडिगोचे 6 विमानांना रविवारी ( 20 ऑक्टोबर) बॉम्बने उडविण्याची धमकी दिल्याचे उघडकीस आली आहे. एकाच आठवड्यात 70 हून अधिक विमानांना धमकीचे कॉल आल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, दरम्यान शनिवारी DGCA प्रमुख विक्रम देव दत्त यांची बदली करुन त्यांना कोळसा मंत्रालयाचे सचिव करण्यात आले आहे.यास विमानांना मिळालेल्या धमकी प्रकरणांशी जोडले जात आहे.

इंडिगोच्या पुणे ते जोधपुरच्या फ्लाईट क्रमांक 6E133 ला बॉम्बने उडविण्याची निनावी धमकी देणारा कॉल आल्यानंतर जोधपूर विमानतळावर या विमानाला सुरक्षित उतरविण्यात आले. विमानतळावर विमान आणि प्रवाशांची चौकशी आणि तपासणी केली जात आहे. फायर ब्रिगेड, पोलीस आणि डॉग स्क्वॉड घटनास्थळी दाखल झाले आहे. ज्या- ज्या फ्लाईटना धमक्या आल्या आहेत त्यांच्यावर आम्ही नजर ठेवून आहोत.आमच्यासाठी प्रवासी आणि क्रु मेंबरची सुरक्षा महत्वाची आहे. संबंधित अधिकारी एकत्र काम करीत आहेत. सर्व सावधानता बाळगली जात असल्याचे इंडिगोच्या प्रवक्त्याने म्हटले आहे. तर अकासा एअर लाईनच्या सहा विमानांना धमक्यांचे कॉल आल्याने त्यांना अलर्ट करण्यात आले.

अकासाच्या सहा विमानांना फटका

अकासाच्या (QP) 1102 अहमदाबाद ते मुंबई, क्यूपी 1378 दिल्ली ते गोवा, क्यूपी 1385 मुंबई ते बागडोगरा, क्यूपी 1406 दिल्ली ते हैदराबाद, क्यूपी 1519 कोच्ची ते मुंबई, क्यूपी 1526 लखनऊ ते मुंबईसाठी उड्डाण घेत असताना हे कॉल आले होते. त्यांच्या अधिकाऱ्यांनी स्थानिक प्रशासनाशी ताळमेळ ठेवत आपात्कालिन सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन केल्याचे अकासा एअरलाईन्सने म्हटले आहे. याच्या एक दिवस आधी शनिवार (19 ऑक्टोबर 2024) देखील एअर इंडिया, इंडिगो, विस्तारा आणि अकासा एअर लाईन्सच्या 5-5 फ्लाईट्सना धमकीचे कॉल आले होते.

आठवड्यात 200 कोटींचा फटका

विमानांना धमकीचे कॉल आल्यानंतर त्यांना त्यांच्या डेस्टीनेशन ऐवजी नजीकच्या विमानतळांवर लॅण्ड करावे लागते. त्यामुळे इंधनाचा खर्च जादा होतो. विमानाची पुन्हा तपासणी, प्रवाशांना हॉटेलाची रहाण्याची सोय करणे आणि त्यांच्या ठिकाणापर्यंत पोहचण्याची व्यवस्था कंपन्यांना करावी लागते.

राष्ट्रवादी पुन्हा एक होणार? रोहित पवारांच्या आईनं काय केलं वक्तव्य?
राष्ट्रवादी पुन्हा एक होणार? रोहित पवारांच्या आईनं काय केलं वक्तव्य?.
साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनला ‘पुष्पा 2’प्रकरणी अटक, नेमकं काय घडलं?
साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनला ‘पुष्पा 2’प्रकरणी अटक, नेमकं काय घडलं?.
फडणवीसांचं वक्फ बोर्ड विधेयकासंदर्भात मोठं वक्तव्य, जिथे बोट ठेवतील...
फडणवीसांचं वक्फ बोर्ड विधेयकासंदर्भात मोठं वक्तव्य, जिथे बोट ठेवतील....
बेस्ट चालकांची सरप्राईज टेस्ट;महाव्यवस्थापकांचे कंत्राटदारांना निर्देश
बेस्ट चालकांची सरप्राईज टेस्ट;महाव्यवस्थापकांचे कंत्राटदारांना निर्देश.
महापालिका निवडणुका या महिन्यानंतरच, 22 जानेवारीच्या सुनावणीवर भवितव्य
महापालिका निवडणुका या महिन्यानंतरच, 22 जानेवारीच्या सुनावणीवर भवितव्य.
फडणवीस दिल्लीतून यादी घेऊन आले? नव्या सरकारमध्ये कोण-कोण होणार मंत्री?
फडणवीस दिल्लीतून यादी घेऊन आले? नव्या सरकारमध्ये कोण-कोण होणार मंत्री?.
राजधानीत बंगला सुनेत्रा पवारांना पण दिल्लीचं बळ अजितदादांना?
राजधानीत बंगला सुनेत्रा पवारांना पण दिल्लीचं बळ अजितदादांना?.
आरोग्य 'खतरे में'... बोगस औषधांचा सुळसुळाट अन् जनतेच्या आरोग्याशी खेळ?
आरोग्य 'खतरे में'... बोगस औषधांचा सुळसुळाट अन् जनतेच्या आरोग्याशी खेळ?.
अजितदादा शरद पवार यांना भेटले, कारण काय? सेना म्हणतेय, आम्हाला धोका...
अजितदादा शरद पवार यांना भेटले, कारण काय? सेना म्हणतेय, आम्हाला धोका....
'वन नेशन वन इलेक्शन' वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?
'वन नेशन वन इलेक्शन' वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?.