टिक टॉक कंपनीची भारतात 1 बिलियन डॉलरची गुंतवणूक, नवं अॅप लाँच होणार

मुंबई : भारतात टिक टॉक अॅपवर बंदी आणली आहे. मात्र टिक टॉक कंपनी भारतात आता 1 अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार आहे. बाईट डान्स चीनमधील एक स्टार्टअप कंपनी आहे. याच कंपनीचा टिक टॉक अॅप आहे. याआधी कंपनीने भारतात काही अॅपसाठी 1 अब्ज डॉलरची गुंतवणूक केली आहे. यामध्ये विगो, हेलो आणि टिक टॉकचा या अॅपचा  समावेश आहे. पुढच्या […]

टिक टॉक कंपनीची भारतात 1 बिलियन डॉलरची गुंतवणूक, नवं अॅप लाँच होणार
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:00 PM

मुंबई : भारतात टिक टॉक अॅपवर बंदी आणली आहे. मात्र टिक टॉक कंपनी भारतात आता 1 अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार आहे. बाईट डान्स चीनमधील एक स्टार्टअप कंपनी आहे. याच कंपनीचा टिक टॉक अॅप आहे. याआधी कंपनीने भारतात काही अॅपसाठी 1 अब्ज डॉलरची गुंतवणूक केली आहे. यामध्ये विगो, हेलो आणि टिक टॉकचा या अॅपचा  समावेश आहे. पुढच्या महिन्यात बाईट डान्स भारतात एक नवीन अॅप लाँच करण्याच्या तयारीत आहे.

कंपनी गेल्या काही महिन्यांपासून कॉन्टेन्ट मॉडरेशन पॉलिसीला मजबूत करत आहे. भारतात टिक टॉकवर बंदी केल्यामुळे वाईट वाटलं, पण मला अपेक्षा आहे यावर आम्ही काही तरी मार्ग शोधू. भारतीय यूजर्सला आमचा शब्द आहे, कंपनीकडून येणाऱ्या तीन वर्षात एक वेगळं अॅप लाँच करु, असं बाईट डान्सचे आंतरराष्ट्रीय पब्लिक पॉलिसी डायरेक्टर म्हणाले.

बाईट डान्स लवकरच भारतात एक व्हिडीओ शेअरिंग अॅप लाँच करणार आहे. या कंपनीचे एकूण 20 अॅप्स आहेत. यामध्ये तीन अॅप हे भारतात आहेत. नवीन लाँच होणारे अॅप टिक टॉकसारखा असेल की इतर वेगळ्या प्लॅटफॉर्मवर असेल याबद्दल कंपनीने अजून स्पष्ट केलं नाही. तसेच यावर्षाच्या अखेरीस कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या संख्येतही वाढही करणार आहे.

भारतात टिक टॉक अॅपचे एकूण 130 कोटी यूजर्स आहेत. या अॅपने खूप कमी कालावधीत प्रसिद्धी मिळवली. आज मोठ्या प्रमाणात हा अॅप भारतीय वापरत आहेत. पण काही आक्षेपार्ह व्हिडीओ या अॅपच्या माध्यमातून व्हायरल होत असल्याने मद्रास हायकोर्टाकडून या अॅपवर बंदी घालण्यात आली. हायकोर्टाच्या आदेशानंतर कंपनीने गुगल प्ले स्टोअरमधूनही अॅप हटवला. यामुळे नवीन युजर्स हा अॅप डाऊनलोड करु शकत नाही. मात्र ज्या यूजर्सकडे हा अॅप आहे ते याचा वापर करु शकतात.

Non Stop LIVE Update
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.